मुंबई: मोबाईल म्हटलं की आपण विचार करतो 20 ते 30 हजाराचा एखादा स्मार्टफोन अगदीच महागडा घ्यायचा तर दीड दोन लाखाचा एखादा मोबाईल पण हजारो डॉलर्स देऊन कोण फोन घेईल का? असेही शौकीनं आहेत जे हजारो डॉलर्स देऊन फोन खरेदी करू शकतात. रुपयात जर विचार करायचा तर फोनची किंमत लाखो आणि कोट्यवधींच्या घरात जाते. आज असे आपण जगातील सर्वात 5 महागडे फोन आणि त्याबद्दल खास जाणून घेणार आहोत.
Diamond Crypto मोबाईल: या फोनची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. ऑस्ट्रेलिय़न सराफ पीटर एलिसन आणि रुसच्या फर्म जेएससी एंकॉर्टने हा फोन तयार केला आहे. या फोनच्या बाजूच्या कडांना 50 हिरे लावण्यात आले आहेत. यामध्ये 5 निळ्या रंगाच्या हिऱ्यांचाही सामावेश आहे. तर या फोनचा लोगो 18 कॅरेट गोल्डपासून तयार करण्यात आल्याची चर्चा आहे. याची साधारण किंमत 9.3 कोटी रुपये आहे. High Level Encryption या फोनमध्ये देण्यात आलं आहे.
Samsung Galaxy S21 Ultra Caviar Edition: जगातील सर्वात महागड्या फोनमध्ये दुसऱ्या क्रमांकावर या फोनचा नंबर लागतो. या फोनचे 4 व्हेरिएन्ट आहेत. गोल्ड, डायमंड, टाइटेनियम आणि लेदर. या फोनला दोन डायमंड लावण्यात आले आहेत. या फोनमध्ये 128 GB स्टोरेज आहे. याची किंमत 20 हजार डॉलर एवढी आहे. म्हणजेच जवळपास 14.5 लाख रुपये.
Caviar iPhone 12 Pro Pure Gold: हा जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन आहे. असे फक्त 7 मोबाईल तयार करण्यात आले आहेत. याची किंमत 1,22, 000 डॉलर्स आहे. म्हणजे जवळपास 91 लाख रुपयेच म्हणा ना. हा फोन जर भारतात ऑर्डर केला तर इतर कर लागणार ते वेगळेच. 18 कॅरेट सोन्यासोबत यामध्ये डायमंड बसवण्यात आले आहेत. त्यामुळे या फोनची किंमत खूप जास्त आहे. या फोनचे फीचर्स iPhone 12 Pro सारखे आहेत.
Goldvish Le Million: या फोनची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. 2006 मध्ये याची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली होती. या फोनच्या बॉडीवर 120 हिरे लावण्यात आले आहेत. याशिवाय 18 कॅरेट सोन्याचा वापरही करण्यात आला आहे. याची साधारण किंमत 7.7 कोटी रुपये एवढी असल्याची चर्चा आहे. कंपनीने याचे केवळ 3 मॉडेल लाँच केले होते.
हा फोन देखील जगातील सर्वात महागडा फोन आहे. या फोनची खासियत ही आहे की 200 वर्षापूर्वीचं जुनं प्लायवूड या फोनच्या डिझाइनसाठी वापरण्यात आलं आहे. 45.5 कॅरेट ब्लॅक डायमंड 180 ग्रॅम गोल्ड वापरण्यात आलं आहे. या फोनची साधारण किंमत 7.1 कोटी रुपये आहे.