गूगल, ऍपलच्या ऍप स्टोअरमधून 'टिकटॉक' हटवलं, पण...

यूझर्सला गूगल आणि ऍपल ऍप स्टोअरमधून 'टिकटॉक' डाऊनलोड करता येणार नाही परंतु...

Updated: Apr 18, 2019, 12:54 PM IST
गूगल, ऍपलच्या ऍप स्टोअरमधून 'टिकटॉक' हटवलं, पण... title=

मुंबई : भारत सरकारनं दिलेल्या आदेशानंतर गूगल आणि ऍपल या कंपन्यांनी आपापल्या ऍप स्टोअरमधून 'टिकटॉक' हे चायनीज ऍप हटवलं आहे. मद्रास उच्च न्यायालयानं 'टिकटॉक'वर बंदीचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय कायम ठेवला. मीडियाच्या रिपोर्टनुसार हे सिद्ध होतंय की अशा मोबाईल ऍपद्वारे पॉर्नोग्राफी आणि आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ उपलब्ध करून दिले जातात, असं न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं होतं. शिवाय मीडियानंही टिकटॉक व्हिडिओ क्लिपचं प्रसारण करू नये, असे आदेशही न्यायालयानं दिले होते. त्यावर कारवाई करत सरकारनं हे ऍप हटवण्याचे गूगल प्ले स्टोअर आणि ऍपलच्या ऍप स्टोअरला आदेश दिले होते. त्यामुळे आता यूझर्सला टिकटॉक या ऍप स्टोअरमधून डाऊनलोड करता येणार नाही. 

...तरीही युझर्स टिकटॉक वापरू शकतात

परंतु, कंपनी टेकएआरसी केके संस्थापक आणि मुख्य विश्लेषक फैसल कावुसा यांच्या म्हणण्यानुसार, गूगल आणि ऍपलनं ऍप स्टोअरमधून हे ऍप हटवले असले तरीदेखील ज्या यूझर्सनं ते आधीच आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहेत ते व्हिडिओ पाहू शकतील. 

तसंच टिकटॉकचा एखादा युझर 'शेअरइट ऍप'द्वारेही टिकटॉक दुसऱ्या मोबाईलमध्ये शेअर करू शकतो. ऍप शेअर केल्यानंतर दुसरा युझरही ते ऍप इन्स्टॉल करून नवीन युझर आयडी बनवू शकतो. 

चीनची कंपनी 'बाईटडान्स'चं टिकटॉक हे ऍप तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.