वॉइस स्टेटस, चॅट लॉक आणि बरंच काही...; WhatsApp चे नवीन हटके Features पाहिलेत का?

WhatsApp Features : 2023 मध्ये Whatsapp ने युजर्ससाठी कोणते नवीन फीचर्स लॉन्च केले आहेत आणि युजर्ससाठी ते कसे उपयुक्त ठरेल ते पाहूया 

Updated: Jun 21, 2023, 09:00 PM IST
वॉइस स्टेटस, चॅट लॉक आणि बरंच काही...; WhatsApp चे नवीन हटके Features पाहिलेत का? title=

WhatsApp Features 2023 : आजकाल आपल्या प्रत्येकाच्या फोनमध्ये व्हॉट्सएप हे असतंच. काही छोटी गोष्ट कोणाला सांगयची असेल तर आपण लगेच व्हॉट्सअॅपवर मेसेज करतो. अशातच आता  Whatsapp यूजर्सच्या सोयीसाठी वेगवेगळे फीचर्स लाँच करण्यात आलेत. या वर्षी Whatsapp ने 5 नवीन फीचर्स लाँच केलेत. हे यूजर्ससाठी अतिशय उपयुक्त आहेत. चला पाहूया हे 5 नवीन वैशिष्ट्ये.

मल्टीपल अकाउंट फीचर  

युजर्स बऱ्याच काळापासून याची वाट पाहत आहेत. कारण हे वैशिष्ट्य आता तुम्हाला एकापेक्षा जास्त डिव्हाइसमध्ये एक अखाऊंट वापरण्याची परवानगी देतं. तुम्हाला फक्त वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा आणि Link To Existing Account वर क्लिक करा

चॅट लॉक 

पूर्वी युझर्सना चॅट लपवण्यासाठी चॅट आर्काइव करावे लागायचे किंवा व्हॉट्सअॅपला लॉक करावे लागायचे, परंतु कंपनीने वापरकर्त्यांची ही समस्या दूर करत चॅट लॉक करण्याचे वैशिष्ट्य आणले आहे. चॅट लॉक करण्यासाठी तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे चॅट ओपन करावे लागेल आणि नंतर त्यांच्या नावावर क्लिक करावे लागेल, नावावर क्लिक केल्यानंतर येथे खाली स्क्रोल करा तुम्हाला चॅट लॉकचा पर्याय दिसेल.

एडिट मॅसेज

हे फीचर युजर्ससाठी खूप महत्वाचे आहे कारण आत्तापर्यंत मेसेज पाठवताना काही चूक झाल्यास तो मेसेज डिलीट करून पुन्हा टाईप करावा लागायचा पण आता मेसेज पाठवल्यानंतर जर काही चूक झाली तर तुम्ही तो डिलीट न करता एडिट करू शकता. मेसेज पाठवल्यानंतर १५ मिनिटांच्या आत मेसेज एडिट करू शकतो.

स्टेटस लिंक प्रीव्यू 

जर एखाद्याने युझरच्या स्थितीवर कोणतीही लिंक पेस्ट केली तर, आता या वैशिष्ट्यानंतर, व्हाट्सएप URL आणते आणि नंतर URL मध्ये Thumbnail म्हणून त्याचा फोटो दिसून येतो.

वॉइस स्टेटस

व्हॉट्सअॅपवर स्टेटस टाकण्यासाठी युजर्सना आता टाइप करण्याची गरज नाही. युजर्सच्या सोयीसाठी कंपनीने यावर्षी व्हॉईस स्टेटस फीचर देखील आणले आहे