Royal Enfield best-selling motorcycles: रॉयल एनफिल्डच्या बाइक्सना तरुणांची सर्वाधिक पसंती आहे. या बाइक्सबद्दल तरुणांमध्ये चर्चा असते. होंडा, जावा आणि Yezdi या कंपन्यांच्या बाइक रॉयल एनफिल्डच्या बाइकशी स्पर्धा करतात. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही. 350 सीसी सेगमेंटमध्ये या रॉयल एनफिल्डच्या बाइक्सना सर्वाधिक मागणी आहे. रॉयल एनफिल्डने काही महिन्यांपूर्वी आपली Hunter 350 बाइक लाँच केली होती. या बाइकला ग्राहकांची पसंती मिळत आहे. सप्टेंबर 2022 मध्ये रॉयल एनफिल्डच्या तीन सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाइक्सबद्दल जाणून घेऊया.
1. Royal Enfield Classic 350- रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 या बाइकला मोठी मागणी आहे. अनेक वर्षांपासून कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाइक आहे. सप्टेंबर 2022 मध्ये या बाईकच्या 27,571 युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत हे प्रमाण 101 टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीने गेल्या वर्षी ही बाईक अपडेट केली असून जे-सिरीज इंजिन दिले आहे. हे इंजिन अधिक स्मूथ आणि इंधन कार्यक्षम आहे.
2. Royal Enfield Hunter 350- रॉयल एनफिल्ड हंटर हे कंपनीचे दुसरे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल आहे. जे काही महिन्यांपूर्वी लॉन्च करण्यात आले होते. ही कंपनीच्या सर्वात स्वस्त बाइक्सपैकी एक आहे. त्याची किंमत 1.49 लाख रुपयांपासून सुरू होते. सप्टेंबर 2022 मध्ये, रॉयल एनफिल्डने हंटरच्या 17,118 युनिट्सची विक्री केली, जी बाजारात नवीन मोटरसायकलसाठी चांगली सुरुवात आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी बेस्ट Smartphone! किंमत 7 हजार रुपयांच्या आत, फीचर्स वाचून व्हाल खूश
3. Royal Enfield Meteor 350- रॉयल एनफिल्ड Meteor 350 हे सप्टेंबर 2022 मध्ये सर्वाधिक विकले जाणारे तिसरे मॉडेल आहे. ही कंपनीची क्रूझर बाइक असून लांबचा प्रवासही आरामदायी करते. सप्टेंबर 2022 मध्ये, रॉयल एनफिल्डने या बाइकच्या 10,840 युनिट्सची विक्री केली. तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केवळ 6,184 युनिट्सची विक्री झाली होती.