एटीएम कार्डचा पासवर्ड विसरला?; घाबरू नका, घरीच करा रिसेट

पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर ही तशी नित्याची बाब. पण, अनेकदा पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेल्यावर ध्यानात येते की, अरेच्चा मला एटीएम कार्डचा पीनच (पासवर्ड) आठवत नाही. मग अनेकांचा गोंधळ उडतो. अशा वेळी घाबरू नका. तुमच्या एटीएम कार्डचा पासवर्ड घरीच सेट करा.. त्यासाठी वापरा सोपी पद्धती...

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 14, 2017, 06:30 PM IST
एटीएम कार्डचा पासवर्ड विसरला?; घाबरू नका, घरीच करा रिसेट title=

मुंबई : पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर ही तशी नित्याची बाब. पण, अनेकदा पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेल्यावर ध्यानात येते की, अरेच्चा मला एटीएम कार्डचा पीनच (पासवर्ड) आठवत नाही. मग अनेकांचा गोंधळ उडतो. अशा वेळी घाबरू नका. तुमच्या एटीएम कार्डचा पासवर्ड घरीच सेट करा.. त्यासाठी वापरा सोपी पद्धती...

कोणत्या बॅंकांनी दिली सूविधा

तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही तुमच्या एटीएम पीन दोन वेळा घरीच रिसेट करू शकता. तेसुद्धा बॅंकेत न जाता. आज घडीला घरच्या घरी पासवर्ड रिसेट करण्याची सुविधा तीन बॅंकानी दिली आहे. ज्यात एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि कोटक महिंद्रा बॅंकेचा समावेश आहे. या बॅंकेची एटीएम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना जर एटीएमचा पासवर्ड बदलायचा असेल तर, त्यासाठी मोबाईल बॅंकींग किंवा इंटरनेट बॅंकींगचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी या बॅंकांची अॅपही कामी येऊ शकतात.

कसा कराल पासवर्ड रिसेट?

मोबाईल किंवा इंटरनेट बॅंकिंग करण्यासाठी संबंधीत बॅंकेच्या वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटवर तुम्हाला पीन रिसेट करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करा. मागितलेली माहिती भरा. त्यासाठी तुमचा बॅंकेकडे रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांकाचा वापर करणे आवश्यक आहे. तरच, तुम्हाला पासवर्ड बदलता येईल. अन्यथा नाही. तुम्ही पिन रीजनरेट करण्यासाठी लॉग इन केले की, तुमच्या बॅंकेकडे असलेल्या रजिस्टर मोबाईलच्या इनबॉक्समध्ये मेसेजद्वारे क्रमांकावर तत्काळ एक वन टाईम पासवर्ड (ओटीपी) येईल.

कोणत्या बॅंकेसाठी कसा पासवर्ड रिसेट कराल?

आयसीआयसीआय बॅंक : नेट बॅंकींगवर लॉग इन करा. माय कार्ड माय पीनवर क्लिक करा. डेबिट कार्ड नंबर आणि सीव्हीव्ही नंबर टाकताच आपल्या फोनवर ओटीपी येईन. तो योग्य ठिकाणी टाका आणि आपला पीन रिसेट करा.

एचडिएफसी बॅंक :  मोबाईल अॅप किंवा नेटबॅंकींगवर जा. डेबिट कार्ड सेक्शन ओपन करा. योग्य माहिती देताच तुमच्या रजिस्टर मोबाईलवर ओटीपी येईल. जो टाकताच तुम्हाला तुमचा पीन रिसेट करता येईल.

कोटक महिंद्रा बँक : मोबाईल अॅपवर डेबिट कार्ड रिक्वेस्ट या पर्यावर जा. रीजनरेट पीनवर क्लिक करा. आवश्यक माहिती भरा. कन्फर्म करा. तुमचा पीन दुसऱ्यांदा रिसेट होईल.