Meloni यांनी कोणत्या मोबाईलमधून घेतला PM मोदींसोबत सेल्फी? डिस्काऊंटमध्ये घेण्याची संधी

इटलीच्या पंतप्रधान Giorgia Meloni यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सेल्फी घेतला. हा सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे मेलोनी यांनी कोणत्या फोनने सेल्फी घेतला. त्या फोनची किंमत किती आहे याची.

राजीव कासले | Updated: Jun 17, 2024, 07:56 PM IST
Meloni यांनी कोणत्या मोबाईलमधून घेतला PM मोदींसोबत सेल्फी? डिस्काऊंटमध्ये घेण्याची संधी title=

पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 शिखर सम्मेलनात सहभागी झाले होते. या सम्मेलनात अनेक महत्त्वाच्या मुद्दांवर चर्चा झाली. पण यात सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला, तो म्हणजे इटलीच्या पंतप्रधान Giorgia Meloni यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत घेतलेला सेल्फी. मेलोनी यांनी तीन सेकंदाचा हा व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर या सेल्फीचं चांगलंच कौतुक झालं. पण सर्वांच्या मनात उत्सुकता आहे ती म्हणजे  मेलोनी यांनी कोणत्या फोनने सेल्फी घेतला. त्या फोनची किंमत किती आहे याची.

तो फोन कोणता?
Giorgia Meloni यांनी पीएम मोदी यांच्या सोबत ज्या फोनने सेल्फी घेतला तो फोन अॅपलचा आहे. याची साईज आणि डिझाईन पाहाता हा लेटेस्ट आयफोन-15 प्रो मॅक्स असल्याचं समजतं. असा फोन महागडा असून आता तो डिस्काउंटमध्ये घेण्याची संधी सामान्य ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. 

Apple iPhone 15 Pro Max
Apple iPhone 15 Pro Max मध्ये अॅडव्हान्स फिचर्स आहेत. या फोनचा डिस्प्लेही मोठा आहे. आयफोन-15 प्रो मॅक्समध्ये फोटो आणि व्हिडिओसाठी प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. अॅपलच्या आधीच्या स्मार्टफोनपेक्षा हा जास्त आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. हा फोन आयपीएलच्या इतर फोनच्या तुलनेत महागडा आहे.

किंमत आणि डिस्काऊंट
Apple iPhone 15 Pro Max ची किंमत अॅपलच्या वेबसाईटवर  ,59900 इतकी आहे. पण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर डिस्काऊंटमध्ये विकत घेऊ शकता. अमेझॉनवर आयफोन-15 प्रो मॅक्स मोबाईलवर 7 टक्के डिस्काऊंट आहे. म्हणजे या फोनची किंमत 1,48,900 रुपये होते. शवाय बँक क्रेडिट कार्डवरही डिस्काऊंट ऑफऱ करण्यात आल्या आहेत. काही मोजक्या क्रेडिट कार्डवरुन पेमेंट केल्यास 3 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळतोय. एक्सचेंज ऑफरमध्ये जुना आयफॉन दिल्यास 44,250 सूट मिळू शकते.

पण एक्सचेंज ऑफरमध्ये तुमच्या जुन्या फोनची स्थिती कशी आहे यावरही किती डिस्काऊंट मिळणार हे अबलंबून आहे. जुन्या आयफोनची बॅटरी 80 टक्केपेक्षा कमी नसावी. जुनं मॉडेल थर्डी पार्टी किंवा लोकल दुकानातून खरेदी केलेला नसावा. याशिवाय डिस्प्ले ओरिजनला असवा आणि टच व्यवस्थित असावा. तसंच फोनचा इन्शुरन्स असेल तर एक्सचेंज ऑफमध्ये चांगली सूट मिळण्याची शक्यता असते.