Coca Cola Smartphone: आतापर्यंत कोका-कोला (Coca Cola) कोल्ड्रिंग प्यायला असाल. पण आता कोका-कोलाचा स्मार्टफोनही (Coca Cola Smartphone) वापरता येणार आहे. मोठ्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी प्रसिद्ध मल्टिनॅशनल बेवरेज कंपनी (A multinational Beverage Company) कोका-कोला बाजारात नवा स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. कोका-कोला कंपनीच्या स्मार्टफोनचा एक फोटोही लीक आहे. तसंच त्याच्या डिझाइनचाही खुलासा झाला आहे. एका गॅजेट कंपनीने केलेल्या दाव्यानुसार कोका-कोलाचा हा स्मार्टफोन लाल रंगात असेल.
या फोनचा फोटो लीक झाला असला तरी कोका-कोला कंपनीकडून मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. यावर्षातच हा स्मार्टफोन बाजारात उतरवण्याच्या तयारीत कंपनी असल्याचंही सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोका-कोला कंपनी चीनी स्मार्टफोन कंपनीबरोबर हातमिळवणी करणार असून मध्यमवर्गाला परवडेल अशी या स्मार्टफोनची किंमत असेल.
असे असतील फोनचे फिचर्स
तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार कंपनी 'कोला फोन' नावाने बाजारात हा फोन लाँच करेल. या स्मार्टफोनला ड्युअल कॅमेरा असेल. या फोनला 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 16 मेगापिक्सला फ्रंट कॅमेरा असेल. 7.6 इंच असलेल्या या फोनमध्ये 5000 mAh चा बॅटरी बॅकअप असेल. 4, 6 आणि 8 जीबी रॅममध्ये हा फोन उपलब्ध असेल आणि सामान्यांना परवेल अशा किंमतीत म्हणजे 20 हजार रुपयांपर्यंत याची किंमत असेल.
[Exclusive] Here's the all new #Cola Phone
Can confirm that the device is launching this quarter in India.
Coca-Cola is collaborating with a smartphone brand for this new phone.
Feel free to retweet.#ColaPhone pic.twitter.com/QraA1EHb6w— Mukul Sharma (@stufflistings) January 24, 2023
तंत्रज्ञान तज्ज्ञ मुकुल शर्मा यांनी या कोला फोनचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. याच वर्षांच्या तिमाहीत हा फोन भारतात उपलब्ध होईल असा दावा केला आहे.