Google Gemini AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात गुगलने एक पाऊल पुढे टाकले आहे. गुगलने बुधवारी आपले सर्वात शक्तिशाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल सादर केले आहे. गुगलची मूळ कंपनी Alphabet ने सर्वात सक्षम आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल जेमिनी जगासमोर आणले आहे. गुगलने नवीन एआय मॉडेल सर्वात सक्षम केले आहे. जेमिनी एआय आता जगभरातील बार्ड आणि पिक्सेल युजर्संसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात, जेमिनीची थेट स्पर्धा OpenAI च्या ChatGPT आणि Meta च्या Llama 2 सोबत असणार आहे. त्यामुळे आता या सर्वांमध्ये एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे.
अल्फाबेटने आर्टिफिशियल इंटेलिजन्स संशोधन युनिट DeepMind आणि Google Brain एकत्र आणून Google DeepMind युनिट तयार केले. जेमिनी एआय हे या युनिटचे पहिले एआय मॉडेल आहे. हे मॉडेल एका खास पद्धतीने विकसित करण्यात आले आहे. हे एका मल्टीमॉड्यूलसारखे आहे जे अनेक वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आलं आहे. एकाच वेळी अनेक कामे करण्यासाठी जेमिनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवण्यात आले आहे. हे एकाच वेळी विविध प्रकारच्या माहितीवर काम करू शकते, जसे की मजकूर, कोडिंग, ऑडिओ, फोटो आणि व्हिडिओ.
गुगलने हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तीन प्रकारे सादर केले आहे
जेमिनी अल्ट्रा – अधिक कठीण कामांसाठी गुगलचे सर्वात मोठे आणि सर्वात सक्षम मॉडेल.
जेमिनी प्रो – मोठ्या कामांचे स्केलिंग करण्यासाठी गुगलचे सर्वोत्तम मॉडेल.
जेमिनी नॅनो – ऑन-डिव्हाइस कामांसाठी गुगलचे सर्वात कार्यक्षम मॉडेल.
तर अँड्रॉइड युजर्ससाठी, जेमिनी नॅनो AICore हे अँड्रॉइड 14 मध्ये उपलब्ध असेल. 6 डिसेंबरपासून जेमिनी नॅनो AICore पिक्सेल 8 मध्ये उपलब्ध केले गेले आहे. इतर अँड्रॉइड डिव्हाइसवर देखील हे लवकरच उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. जेमिनी नॅनो पिक्सेल 8 स्मार्टफोनमध्ये Gboard मध्ये स्मार्ट रिप्लायचे फिचर आणणार आहे. तसेच हे स्मार्ट रिप्लायचे फिचर व्हॉट्सअॅपमध्येही येईल. जेमिनी अल्ट्रा सध्या काही ग्राहक, विकासक, भागीदार आणि सुरक्षा आणि जबाबदारी तज्ञांना चाचणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. जेमिनी अल्ट्रा पुढील वर्षाच्या सुरुवातीला एंटरप्राइझ ग्राहकांसाठी आणले जाईल.
लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) रिसर्च आणि डेव्हलपमेंट (R&D) मध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्या 32 शैक्षणिक बेंचमार्कपैकी जेमिनी अल्ट्राने 30 पेक्षा जास्त कामगिरी केली यावरून जेमिनीची क्षमता मोजली जाऊ शकते. याशिवाय, हे पहिले मॉडेल आहे ज्याने मानवी तज्ञांना म्हणजे मानवांना MMLU (मॅसिव्ह मल्टीटास्क लँग्वेज अंडरस्टँडिंग) बेंचमार्कवर पराभूत केले. हा बेंचमार्क गणित, भौतिकशास्त्र, इतिहास, कायदा, वैद्यकशास्त्र आणि नीतिशास्त्र यासारख्या 57 विषयांचा वापर करून जागतिक ज्ञान आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेचे मोजमाप करतो.