Flipkart वर ग्राहकांचा Shopping Experience आता आणखी मजेदार...अ‍ॅपमध्ये कॅमेरा लाँच... याचा फायदा काय?

यांमुळे ग्राहकांचा शॉपींंगचा अनुभव अनेक पटींनी वाढवू शकतो.

Updated: Jul 22, 2021, 06:38 PM IST
Flipkart वर ग्राहकांचा Shopping Experience आता आणखी मजेदार...अ‍ॅपमध्ये कॅमेरा लाँच... याचा फायदा काय? title=

मुंबई : ई-कॉमर्स मार्केट प्लेस फ्लिपकार्टने बुधवारी फ्लिपकार्ट अॅपवर ऑगमेंटेड रियलिटी (एआर) सक्षम फ्लिपकार्ट कॅमेरासह एक इमर्सिव ई-कॉमर्स अनुभव सादर केला. यामध्ये ग्राहकांना उत्पादन किंवा वस्तू प्रत्यक्षात कशी दिसेल? याची कल्पना ग्राहकांना मिळेल. कंपनीने म्हटले आहे की, फ्लिपकार्ट कॅमेराचे उद्दीष्ट ग्राहकांसाठी ऑनलाइन अनुभव अधिक आकर्षक आणि फायद्याचे बनवणे आहे, यामुळे ग्राहकांना योग्य निर्णय घेण्यास मदत मिळणार आहे.

फ्लिपकार्टचे मुख्य उत्पादन आणि तंत्रज्ञान अधिकारी जयंद्रन वेणुगोपाल यांनी निवेदनात म्हटले आहे की, “फ्लिपकार्ट कॅमेरा वैशिष्ट्यामुळे ग्राहकांना घरातल्या घरात घरगुती प्रात्यक्षिके घेऊन अनुभवाची उंची वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे. यामुळे ग्राहकांना खरेदी करण्यापूर्वी एक योग्य निर्णय घेण्यास मदत होते."

वेणुगोपाल म्हणाले, या तंत्रज्ञानामध्ये दूरगामी अनुप्रयोग आहेत आणि यांमुळे ग्राहकांचा अनुभव अनेक पटींनी वाढवू शकतो. तसेच ग्राहकांना योग्य उत्पादन शोधण्यात मदत करू शकतो.

फर्निचर, सामान आणि मोठ्या उपकरणे यासारख्या विभागांमध्ये जिथे ग्राहकांना उत्पादनाचा आकार आणि त्याचे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जागेत फिट बसत आहे किंवा नाही? तसेच वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्याचे सौंदर्य म्हणजेच ती वस्तू त्याचे मटेरीअल समजणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहक फ्लिपकार्ट कॅमेरा वापरुन त्या वस्तू पाहू शकतात. 

हे फीचर आणण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे, यामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांचे अंदाज बांधणे दूर होईल.

स्मार्टफोनचा वेगवान अवलंबन करण्याच्या कल्पनेबरोबरच ग्राहकांमध्ये ऑगमेंटेड रिअॅलिटीच्या वापरासही प्रोत्साहन देण्यात आले आहे.

एक मीडिया अहवालानुसार, जनरल झेड आणि मिलेनियल्स एआर आणि व्हर्च्युअल रियलिटी (व्हीआर) वैशिष्ट्यांची मागणी वाढवत आहेत. एका रिसर्चनुसार 30 टक्के सॅम्पल स्पेस लोकांना त्यांच्या शॉपींग करण्याच्या अनुभवात अधिक एआर / व्हीआर क्षमता समाविष्ट करण्यावर सहमती दर्शवली आहे.