TATA हॅरियर, सफारीचे नवे मॉडेल, त्यांची किंमत, फिचर्स पाहून म्हणाल, आणि काय हवं...?

TATA Cars : ज्यावेळी एखादी कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा अनेक निकष अंदाजात घेतले जातात. त्यातही कार महागडी असेल, तर त्यामध्ये आपण भरतोय तितक्या पैशांमध्ये सुविधा योग्य आहेत ना हे पाहण्यालाच अनेकांचं प्राधान्य.  

सायली पाटील | Updated: May 3, 2023, 04:16 PM IST
TATA हॅरियर, सफारीचे नवे मॉडेल, त्यांची किंमत, फिचर्स पाहून म्हणाल, आणि काय हवं...?  title=
Tata Safari Dark Edition review features and price details latest auto news

TATA Cars : काही कार कंपन्यांना कायच ग्राहकांची पसंती असते. याच धर्तीवर या कंपन्यांकडून विविध दरांमध्ये प्रत्येक उत्पन्न गटातील व्यक्तीच्या खिशाला परवडेस अशा काही कार बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. कार खरेदीसाठी गेलं असता बऱ्याचदा काही अशा मॉडेल्सना पसंती मिळते जिथं बजेटचा विचार केला जात नाही, कारण प्रश्न असतो त्या कारच्या अप्रतिम मॉडेल आणि Features चा.

सध्या TATA च्या अशाच दोन कार च्यांच्या गडद काळ्या रंगांमुळं चर्चेचा विषय ठरत आहेत. लाल आणि काळा अशा दोन रंगांच्या रंगसंगतीत असणाऱ्या टाटा कारचे रिव्ह्यू नुकतेच समोर आले आहेत. यामध्ये टाटा हॅरियर आणि सफारी या दोन मॉडेल्सचा समावेश आहे.

डिझाईनमध्ये चार चाँद लावणारा लाल रंग  

काळा रंग कारचे फिचर आणखी उठावदार करत आहे. तर, त्यामध्ये वापरला गेलेला लाल रंग पूर्णपणे काळ्या रंगातील गोष्टींना एक वेगळं महत्त्वं देऊन जात आहे. गेल्या काही काळापासून क्रोम प्लेटिंगच्या पर्यायांना मिळणारी ग्राहकपसंती हेरत टाटाकडून या कारमध्येही तोच प्रयोग करण्यात आला आहे. जिथं, रेड एक्स्टेंट, रेट ब्रेक कॅलिपर्स यांचा वापर दिसतो.

हेसुद्धा पाहा  : थोडी सी जो पी ली है...; सर्वाधिक मद्यपींच्या देशात भारत कितव्या स्थानावर? पाहा...

इंजिन आणि पॉवर

टाटाच्या सफारी आणि हॅरियन या दोन्ही कारचं रेड जार्क एडिशन 170bhp/350Nm, 2.0 डिझेल इंजिनसह येतं. कमी गतीमध्ये कारचं स्टिअरिंग काहीसं कठीण भासलं तरीही इतर कारच्या तुलनेत ते आरामदायीच आहे.

कारमधील इतर फिचर्सही पाहूनच घ्या...

प्रमीयम 360 कॅमेरा डिस्प्ले, क्लायमेट कंट्रोल, वायरलेस अॅपल कार प्ले, अँड्रॉईड ऑटो, इलेक्ट्रिक बास मोड, अॅडजस्टेबल को पायलट सीट, 6 लँग्वेज कमांड, इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन डिपार्चर वॉर्गिंग हे आणि असे असंख्य लहानमोठे फिचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.

किंमतीविषयी सांगावं तर, टाटा टॉप एंड सफारी 25 लाख रुपये आणि टाटा हॅरियर रेड डार्क एडिशन 24 लाख रुपयांना उपलब्ध आहे.  कारचं बजेट वाढवून एक प्रिमियम एसयूव्ही घेण्याची तुमचीही इच्छा असेल, तर हे दोन मॉडेल्स तुमची निराशा नक्कीच करणार नाहीत.