गाड्या चार्ज करण्यासाठी टाटाचा नवा प्लान्ट

इलेक्ट्रिसिटी प्रॉडक्शन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन टाटा पावर कंपनीने मुंबईच्या विक्रोळी येथे इलेकट्रोनिक वाहनं चार्ज करण्यासाठी नवा प्लान्ट उभारला आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 22, 2017, 04:06 PM IST
गाड्या चार्ज करण्यासाठी टाटाचा नवा प्लान्ट title=

नवी दिल्ली : इलेक्ट्रिसिटी प्रॉडक्शन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन टाटा पावर कंपनीने मुंबईच्या विक्रोळी येथे इलेकट्रोनिक वाहनं चार्ज करण्यासाठी नवा प्लान्ट उभारला आहे. त्यामुळे अधिकाधिक लोक इलेट्रॉनिक वाहानं वापरण्यासाठी प्रोत्साहीत होतील व इलेट्रॉनिक वाहानं वापरणाऱ्यांचे एक नेटवर्क उभे राहील आणि हाच कंपनीचा उद्देश असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. 

यामुळे आपला देश स्मार्ट चार्जिंग सयंत्र देश होईल आणि २०३० पर्यंत सगळे इलेकट्रोनिक वाहानं वापरू लागतील. हेच ध्येय पूर्ण करण्यासाठी या प्लान्टची नक्कीच मदत होईल. 

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सरदाना यांनी सांगितले की, "आम्ही वाहन चार्ज करण्यासाठी नवा प्लान्ट सुरु केल्याबद्दल आनंदी आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. ऊर्जा बचतीचा हा उत्तम उपाय आहे."