सोशल मीडिया घेणार 1 कोटी लोकांचा जीव? तुम्हीसुद्धा FB, Insta वापरत असाल तर हे वाचाच

Alert : हल्ली दर दुसऱ्या व्यक्तीच्या हातात मोबाईल आणि दर तिसऱ्या व्यक्तीच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळत आहे. या मोबाईलचा तुम्ही नेमका किती टक्के वापर करता? असा प्रश्न विचारला असता मात्र अनेकांचीच बोबडी वळते. 

सायली पाटील | Updated: Jun 16, 2023, 01:20 PM IST
सोशल मीडिया घेणार 1 कोटी लोकांचा जीव? तुम्हीसुद्धा FB, Insta वापरत असाल तर हे वाचाच  title=
study says Social Media may cause deaths of crores details inside

Social Media Usage : हातात मोबाईल असला की, त्यामध्ये न डोकावता आपल्याला क्षणभरही राहता येत नाही. कधी Whats App, कधी Facebook, कधी Instagram तर कधी तत्सम एखादं माध्यम वापरत त्या माध्यमातून नवनवीन गोष्टी Browse करत तुम्हीआम्ही अनेक तासांचा वेळ वाया घालवतो. मुळात इथं वेळ व्यर्थ जातो असंच म्हणणं योग्य ठरणार आहे. कारण, मोबाईल वापरताना त्यातून फारच कमी वेळ सत्कारणी लागतो ही बाबही नाकारता येत नाही. 

तंत्रज्ञानही तुम्हाला इशारा देतंय.. 

तुम्हाला माहितीये का, हल्ली मोबाईलमध्ये तुम्ही तो नेमका किती वेळ वापरता हे सांगणारी सुविधाही आहे. इतकंच नव्हे, तर तुम्ही सर्वाधिक वेळ कोणतं अॅप वापरता, काय वाचता या साऱ्याची तपशीलवार माहिती हे उपकरण देतं. ही माहिती नसते तर हा असतो एक इशारा. मोबाईल आणि पर्यायी सोशल मीडियाच्या वापराचा अतिरेक होतोय याचाच हा इशारा. 

सोशल मीडिया करणार घात 

Meta च्या Frances Haugen यांनी अतिशय महत्वाचा इशारा देत 'जर सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमांमध्ये सुधारणा झाल्या नाहीत तर, येत्या काळात 1 कोटींहून अधिक युजर्सचा बळी जाईल असा इशारा दिला'. संडे टाईम्सशी संवाद साधताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. या त्याच हॉगेन आहेत त्यांनी  'द फेसबुक फाइल्स' नावाचे कागदपत्र लीक केले होते. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अहवालांमध्ये बरीच अंतर्गत माहिती देण्यात आली होती. 

अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार इन्स्टाग्रामचा तारुण्यावस्थेतील मुलाच्या मानसिकतेवर होणाऱ्या परिणामांना मेटानं कमी महत्त्वं दिसलं असून, भारतात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठीही फेसबुकनंच मदत केल्याचं स्पष्ट होत आहे.

हेसुद्धा पाहा : Adipurush पाहण्यासाठी अवतरले साक्षात मारुतीराया? चित्रपटगृहातील माकडांना पाहून चाहत्यांनी जोडले हात 

 

जागतिक स्तरांवरील माहितीनुसार हॉगेन यांच्या मते सोशल मीडियावर पारदर्शीपणाची उणीव आहे. ज्यामुळं होणारं नुकसान थांबण्याचं नाव घेत नाहीये ही बाब त्यांनी प्रकाशात आणली. सोशल मीडिया बदललं पाहिजेच पण त्यासोबतच ते समजून घेण्याच्या पद्धतीही बदलल्या पाहिजेत असं म्हणत संस्कृती बदलणं इतकं सोपं नाही ही वस्तुस्थितीसुद्धा त्यांनी मांडली. येत्या 20 वर्षांमध्ये परिस्थिती बदलली नाही, तर लाखोंचा बळी जाईल याकडे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. 

फेसबुकनं बरीच गुंतागुंत निर्माण केली 

रॉयटर्सनं प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार 2018 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या एका गटानं केलेल्या संशोधनातून म्यानमार येथे झालेल्या नरसंहारासाठी काही अंशी फेसबुकही जबाबदार असल्याचं म्हटलं. किंबहुना जगात अशा अनेक घटना घडल्या जिथं सोशल मीडियामुळं मोठी तेथ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा आता या माध्यमाचा वापर नेमका किती करायचा हे तुम्हीच ठरवा.