Android Settings: मोबाईल म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भागच झाला आहे. थोडा वेळ जरी मोबाईल जवळ नसला तरी आपल्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आपल्या गरजेसोबत तो एक लाइफस्टाइलचाही भाग झाला आहे. चारचौघात वावरताना आपल्या हातात कोणता मोबाईल आहे याची चिंता प्रत्येकाला अपडेटेड राहण्यास भाग पाडते. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात तर मोबाईल नसणं म्हणजे मागासल्यासारखंच वाटतं. दरम्यान, लोकांच्या गरजा लक्षात घेता मोबाईल कंपन्याही त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. यासाठी मोबाईलमध्ये रोज नवनवे फिचर्स देत असतात, जेणेकरुन युजर्सच्या गरजा पूर्ण होतील आणि चांगला अनुभव मिळेल. मोबाईल फोनमध्ये मुख्यत्वे दोन प्रकारचे ऑपरेटिंग सिस्टम आहेत. यामधील एक अँड्रॉईड आणि दुसरा अॅप्पल iOS आहे. पण यामध्ये अँड्रॉईड वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
अँड्रॉईडमध्ये अनेक असे फिचर्स असतात ज्याची युजर्सना कल्पनाच असतो. काही सेटिंग्स या सर्वांनाच माहिती असतात. पण काही सेटिंग या सिक्रेट असतात, ज्या प्रत्येकाला माहिती नसते. पण या सेटिंग आपल्या फार कामाच्या असतात. अशाच काही सेटिंगबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या काही मोजक्याच लोकांना माहिती असतील. या सेटिंग समजल्यानंतर तुम्हीदेखील अँड्रॉईडमधील तज्ज्ञ व्हाल.
तुम्ही तुमच्या अँड्रॉईडचा रिस्पॉन्स स्पीड वाढवू शकता. यासाठी तुम्हाला Settings मधे जावं लागेल. यानंतर खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला System सेक्शनमध्ये Build Number मिळेल.
यावर तुम्हाला 7 वेळा टॅप करावं लागेल. यानंतर तुम्हाला डेव्हलपर झाल्याचा मेसेज मिळेल. आता तुम्ही Menu वर परत गेल्यास System पर्यायात तुम्हाला Developer हा पर्याय दिसेल.
यामध्ये Window Animation Scale वर जावा. यानंतर Transition animation स्केल वर टॅप करा आणि Animator duration scale वर जावा. आता सर्व पर्याय 0.5x वर सेट करा किंवा Off करा. आता तेव्हा जुम्ही एखादा मेन्यू किंवा अॅप उघडाल तेव्हा ते त्याचा वेग वाढलेला दिसेल.
जेव्हा तुमच्या मोबाईलवर मार्केटिंग कंपन्या किंवा इतर फोन येतात तेव्हा नक्कीच त्रास होतो. पण या अशा त्रासापासून वाचण्यासाठी तुम्ही ‘Do Not Disturb’ फिचरचा वापर करु शकता.
फार कमी लोकांना माहिती आहे की, अँड्रॉईड फोनमध्ये Do not disturb मध्ये Priority मोड ही असतो. पण हा पर्याय वापरण्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये priority सेट करावी लागेल.
जर तुमची दृष्टी कमी असेल तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये एक खास सेटिंग करू शकता. Screen Magnifier फिचर चालू करण्यासाठी, तुम्हाला Settings मध्ये जावे लागेल, त्यानंतर Accessibility वर क्लिक करा आणि येथे तुम्हाला Magnification पर्याय दिसेल.