आनंदाची बातमी...जबदरस्त फीचर्सचे Samsung चे २ टॅब लॉन्च होणार...

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए 7 लाइट ( Samsung Galaxy Tab A7 Lite)  स्वस्त आणि खिशाला परवडणारा टॅबलेट असेल

Updated: Jun 17, 2021, 10:12 PM IST
 आनंदाची बातमी...जबदरस्त फीचर्सचे Samsung चे २ टॅब लॉन्च होणार...  title=

मुंबई :  भारतात सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस 7 एफई ( Samsung Galaxy Tab S7 FE ) आणि गॅलेक्सी टॅब ए 7 लाइट (Galaxy Tab A7 Lite) 18 जूनला लॉन्च होणार आहे. तर 23 जूनपासून विक्रीला सुरुवात होणार आहे. याबाबतची माहिती Samsung.com या वेबसाईटवरील लाइव्ह टीझरद्वारे मिळाली आहे. सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए 7 लाइट ( Samsung Galaxy Tab A7 Lite)  स्वस्त आणि खिशाला परवडणारा टॅबलेट असेल. लॉन्च होण्यापूर्वी हे दोन्ही टॅब सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहे. (samsung galaxy tab s7 fe galaxy tab a7 lite launch in india on 18 june 2021 know all details) 

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए 7 लाइटची (Samsung Galaxy Tab A7 Lite) किंमत भारतात 14 हजार 999 च्या जवळपास असू शकते. त्याचबरोबर, कंपनी आपल्या दुसर्‍या टॅबलेट गॅलेक्सी टॅब एस 7 एफईचा (Galaxy Tab S7 FE) बेस व्हेरिएंट 4 जीबी / 64 जीबी स्टोरेजसह 46 हजार 999 रुपये आणि 6 जीबी / 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 50 हजार 999 रुपयांमध्ये लॉन्च करू शकते. ग्राहकांना याची किंमत किती असेल, याबाबतची अधिकृत माहिती ही लॉन्चिंगदरम्यानच कळेल. 
 
Samsung Galaxy Tab S7 FE चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Tab S7 FE टॅबलेटचा उपयोग हा शिक्षणासाठी तसेच अन्य कामांसाठी हे केला जाऊ शकतो. यामध्ये 2,560×1,600 पिक्सलचं 12.4-इंचाचा WQXGA TFT  डिस्प्ले आहे. हा टॅब्लेट स्नॅपड्रॅगन 750 जी प्रोसेसरवर आधारित आहेत. या टॅब्लटेचा रॅम  4 जीबी असून स्टोरेज 64 जीबी इतकी आहे.  मायक्रो एसडी कार्डचाही पर्याय आहे. तसेच स्टोरेज क्षमताही वाढवता येऊ शकते. 

टॅबमध्ये  8 एमपीचा सिंगल रियर कॅमेरा तर 5 एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. हे टॅब्लेट एस पेनसह येईल. विद्यार्थ्यांना नोट्ससाठी तसेच डिझाइन किंवा चित्र काढण्यासाठी याचा वापर करता येऊ शकतो. गॅलेक्सी टॅब एस 7 एफई मध्ये (Galaxy Tab S7 FE ) अँड्रॉइड 11 बेस्ड One UI 3.1 आधारित आहे. 45W  फास्ट चार्जिंग सपोर्टसह 10,090mAh ची मजबूत बॅटरी आहे.  
 
संबंधित बातम्या : 

Facebook कडून भारतीय हॅकरला २२ लाख रुपये मिळाले, नीट वाचा तुम्हीही कमवा...

Vi चा 'हा' प्लान Jio ला देतोय टक्कर, रोज 4GB डेटा सोबत फ्री कॉलिंग