मुंबई : सॅमसंगनं गॅलेक्सी S8 आणि S8+ या दोन स्मार्टफोनवर ४ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिला आहे. नवरात्रीनिमित्त ग्राहकांना हा विशेष डिस्काऊंट देण्यात येत आहे. याचबरोबर एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना सॅमसंगच्या या स्मार्टफोनवरवर आणखी ४ हजार म्हणजेच एकूण ८ हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी S8+ ची किंमत एक हजार रुपयानं कमी करण्याचा निर्णयही कंपनीनं घेतला आहे.
६७,९०० रुपये किंमत असलेल्या गॅलेक्सी S8च्या बूकिंगसाठी तब्बल अडीच लाख जणांनी रजिस्टर केलं आहे. अमेझॉनच्या वेबसाईटवर या फोनसाठी दीड लाख जणांनी बूकिंग केलं आहे. नोट 8साठी अमेझॉनवर पहिल्याच दिवशी ७२ हजार जणांनी रजिस्टर केलं होतं. तर एक लाख जणांनी सॅमसंगच्या वेबसाईटवर बूकिंग केलंय. सोमवारपासून पुन्हा एकदा अमेझॉनवर नोट 8 ची प्री ऑर्डर घ्यायला सुरुवात झाली आहे. २१ सप्टेंबरपासून या स्मार्टफोनच्या डिलिव्हरीला सुरुवात होणार आहे.
- 6.3 इंच क्वाड एचडी सुपर अॅमोलेड डिस्प्ले, इनफिनिटी डिस्प्ले
- 64 जीबी, 128 जीबी, 256 जीबी इंटरनल मेमरी, मायक्रो एसडी कार्डचा पर्याय उपलब्ध
- 12 मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे, 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
- 6 जीबी रॅम
- वायरलेस चार्जिंग
- 3,300 mAh बॅटरी
- 7.1.1 नुगा ऑपरेटिंग सिस्टिम
- मिडनाईट ब्लॅक आणि मेपल गोल्ड रंगामध्ये मिळणार