Royal Enfield Continental GT 650 modified: रॉयल एनफिल्ड भारतात सर्वाधिक पसंत केल्या जाणाऱ्या बाइकपैकी आहे. क्लासिक 350 या बुलेटला सर्वाधिक मागणी आहे. रेट्रो डिझाईन आणि चांगल्या परफॉर्मन्स व्यतिरिक्त अनेक वर्षे टिकून राहण्याची क्षमता आहे. यामुळेच दर महिन्याला हजारो युनिटची विक्री होते. आता कंपनीनं नवी बाइक सादर केली असून फक्त 25 युनिट्सची विक्री केली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या ऑटोमोटिव्ह डिझाइन स्टुडिओ स्कंक मशीनने (Skunk Machine) रॉयल एनफिल्डच्या कॉन्टिनेंटल जीटी 865 नवीन डिझाइनमध्ये सादर केले आहे. नवीन डिझाईन देण्यासोबतच याला सेरा GT 865 (Cerra GT 865) हे नवीन नाव देखील देण्यात आले आहे.
डिझाइन करण्यासाठी, Royal Enfield Continental GT 650 ने मोटरसायकलमधील प्रत्येक बॉडी पॅनल काढून टाकले आहे आणि ते कस्टम-निर्मित कार्बन फाइबर बॉडी पॅनल लावले आहेत. याशिवाय कार्बन फायबरद्वारे संपूर्ण फेअरिंग डिझाइन देण्यात आले आहे. यात सर्कुलर एलईडी हेडलॅम्प, एक्सपोज्ड कार्बन-फायबर बॉडी पॅनल्स, बार-अँड एलईडी टर्न इंडिकेटर आणि नवीन टेललॅम्प्स दिले आहेत. मात्र, फ्यूल टँक कायम ठेवण्यात आली आहे.
इंजिनमध्ये मोठा बदल करण्यात आला असून 865cc इंजिनची जागा आता ट्विन-सिलेंडर इंजिनने घेतली आहे. या बदलामुळे मोटरसायकल अधिक पॉवर आणि टॉर्क देऊ लागली आहे. याशिवाय, बाइकला ड्युअल स्लिप-ऑन एक्झॉस्ट आणि एक्सपोज्ड एअर इनटेकसह 40mm थ्रॉटल बॉडी देखील मिळते.