रस्त्यांवर धिंगाणा घालण्यासाठी Royal Enfield सज्ज, पाहा टॉप 5 Upcoming models

Top 5 Upcoming Royal Enfield bikes in India : रॉयल एनफिल्ड येत्या काही दिवसातच नवीन बाईक लॉन्च करणार आहे. Himalayan 450, Classic 650 आणि असे काही नवीन मॉडेल्स घेऊन येत आहे. कोणते आहेत ते इतर मॉडेल्स ? हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Updated: Jun 14, 2022, 03:15 PM IST
रस्त्यांवर धिंगाणा घालण्यासाठी Royal Enfield सज्ज, पाहा टॉप 5 Upcoming models title=

मुंबई : भारतीय बाजारपेठेत रॉयल एनफिल्ड नवीन बाईक्सची रेंज लॉन्च करणार आहे. 2022-23 या वर्षात रॉयल एनफिल्ड अनेक बाईक्स येणार असल्याने रायडर्समध्ये आनंदाच वातावरण निर्माण झालं आहे. नुकतंच ब्रिटीश कंपनीने Royal Enfield Scram 411 ही बाईक भारतीय ग्रहकांसाठी लॉन्च केली आहे. 

चेन्नई येथे असलेल्या रॉयल एनफिल्ड प्लान्ट लवकरच Himalayan 450, Meteor 650, Classic 650, Hunter and Shotgun अशा मॉडेल्सची रेंज मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे Himalayan 450  या बाईकची चर्चा ही मोठ्या प्रमाणात सुरु आहे, ही बाईक अजून लॉन्च झालेली नाही.

Royal Enfield Himalayan 450
हिमालयानच नवीन व्हर्जन लॉन्चसाठी शेड्यूल केलं आहे. पण, ही बाईक लॉन्च होण्याआधीच भारतीय रस्त्यांवर अनेक वेळा टेस्टिंगच्या निमित्ताने दिसली आहे. या बाईकला 450cc सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन असणार आहे. आत्तापर्यंत इंजिनच्या पॉवर संदर्भात कोणतीही आकडेवारी जाहीर झाली नाही, पण ते 40hp आणि 45Nm टॉर्क निर्माण करतील अशी अपेक्षा आहे. तसेच काही अहवालांनुसार, या बाईकला तीन राइड मोड आणि मोठी व्हील्स असू शकतात.

Royal Enfield Classic 650
ब्रिटीश निर्मात्यांची अपकमिंग बाईक भारतीय रस्त्यांवर अनेकदा स्पॉट झाली आहे. तसेच, बाइकच्या डिझाइनचे अनेक स्पाय शॉट्सच्या बाईकमध्ये गोल हेडलॅम्प, टियरड्रॉप फ्युएल टँक आणि बरेच काही असणार आहे. यात गोलाकार इन्स्ट्रुमेंट पॅनल आणि स्पीट डिˈटॅचेब्ल् पीलियन युनिट्स असण्याची अपेक्षा आहे. बाईकमध्ये 649 सीसी ट्विन-सिलेंडर इंजिन असणार आहे.

Royal Enfield Super Meteor 650
Royal Enfield Meteor आधीच भारतात विक्रीसाठी उपल्बध आहे. परंतु हे नवीन मॉडेल, ज्याला सुपर मेटियर असे नाव देण्यात आलं आहे, ही बाईकची अधिक मजबूत आणि अपग्रेड केलेलं व्हर्जन असणार आहे. नवीन बाईकला इंटरसेप्टर 650 सारखेच इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. Royal Enfield Super Meteor 650 ने 2019 मध्ये रिव्हील झालेल्या KX संकल्पनेसह त्याचे काही डिझाइन शेअर केले आहेत.

Royal Enfield Shotgun
रॉयल एनफिल्ड शॉटगनचे फोटो लोकांसमोर रिव्हील केल्याचे अनेक उदाहरणं आहेत. नुकतेच, अभिनेता सुंग कांगनेही बाईकची काही फोटो शेअर केलेत आणि डिझाइन रिव्हील केलंय. बाईकला ट्रिपर नेव्हिगेशनसह सेम-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल मिळण्याची अपेक्षा आहे. बाईकला कॉन्टीनेंटल GT 650 आणि इंटरसेप्टर 650 सारखे इंजिन मिळण्याची दाट शक्यता आहे.

Royal Enfield Hunter
रॉयल एनफील्ड हंटर 350 रोडस्टर गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. गोलाकार हेडलॅम्प, अलॉय व्हील्स आणि डिस्क ब्रेक्स मिळणार आहे. क्लासिक 350 आणि मीटियर 350 प्रमाणे OHC लेआउटसह बाईक 349cc सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन असेल.