Jio ची धमाकेदार ऑफर! सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन; किंमत ऐकून वाटेल आश्चर्य

 रिलायन्सने युजर्ससाठी धमाकेदार ऑफर आणली आहे.  4G स्मार्टफोन JioPhone Next खूप स्वस्तात खरेदी करता येईल. 

Updated: May 17, 2022, 09:14 AM IST
Jio ची धमाकेदार ऑफर! सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन; किंमत ऐकून वाटेल आश्चर्य title=

मुंबई : रिलायन्सने युजर्ससाठी धमाकेदार ऑफर आणली आहे.  4G स्मार्टफोन JioPhone Next खूप स्वस्तात खरेदी करता येईल. ऑफरचा लाभ घेऊन हा फोन तुम्हाला 4,499 रुपयांना खरेदी करता येईल. कसे आणि कुठे जाणून घेऊया...

रिलायन्सने गेल्या वर्षीच आपला सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. रिलायन्स रिटेलने वापरकर्त्यांना त्यांचे जुने फोन एक्सचेंज करण्यासाठी JioPhone Next फक्त 4,499 रुपयांमध्ये खरेदीची मर्यादित कालावधीची सुट्टी दिली आहे. जुना फोन देवून तुम्ही फक्त 4,499 रुपयांमध्ये JioPhone Next मिळवू शकाल.

ग्राहकांना एक्सचेंज ऑफरचा पर्याय नको असेल तर हा स्मार्टफोन 6,499 रुपयांमध्ये मिळू शकतो. फायनान्स पर्याय देखील आहेत, अशावेळी ग्राहकांना एकूण 2,500 रुपये आगाऊ भरावे लागतील, ज्यामध्ये 501 रुपये प्रक्रिया शुल्क समाविष्ट आहे. 

स्मार्टफोनचे फीचर्स

JioPhone Next हा एक परवडणारा 4G स्मार्टफोन आहे जो 5.45-इंच मल्टीटच HD+ (720×1440 पिक्सेल) डिस्प्लेसह कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 वर येतो. हा ड्युअल-सिम 4G स्मार्टफोन आहे आणि आतमध्ये 3500mAh बॅटरी आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP सेन्सरसह मागील बाजूस एक कॅमेरा आणि समोर 8MP सेन्सर आहे.

JioPhone Next, Reliance, Reliance Jio, JioPhone Next Offer, Jio Offer, JioPhone Next Price