JIO यूजर्सना फक्त आज मिळणार बंपर फायदा, या ऑफरचा शेवटचा दिवस

नव्या वर्षाच्या सुरुवातीला रिलायन्स जिओनं त्यांच्या यूजर्सना जबरदस्त ऑफर दिली होती.

Updated: Jan 15, 2018, 05:44 PM IST
JIO यूजर्सना फक्त आज मिळणार बंपर फायदा, या ऑफरचा शेवटचा दिवस  title=

मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीला रिलायन्स जिओनं त्यांच्या यूजर्सना जबरदस्त ऑफर दिली होती. जिओ ३९९ रुपयांपेक्षा जास्तचा रिचार्ज केल्यावर ३,३०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देत आहे. पण या ऑफरचा आजचा शेवटचा दिवस आहे. जिओकडून ४०० रुपयांचं माय जिओ कॅशबॅक व्हाऊचर, वॉलेटमध्ये ३०० रुपये इंस्टंट कॅश व्हाऊचर आणि ई-कॉमर्स कंपनींचं २,६०० रुपयांचे डिस्काऊंट व्हाऊचर मिळत आहेत.

जिओनं वाढवली आहे कॅशबॅक ऑफर

कंपनी आत्तापर्यंत ३९९ रुपयांच्या रिचार्जवर २,५९९ रुपयांचं कॅशबॅक देत होती. १० नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत ही ऑफर सुरु राहणार होती. पण त्यानंतर ही ऑफर आजपर्यंत वाढवण्यात आली. जिओनं १९९ आणि २९९ रुपयांचे विशेष प्लानही प्राईम ग्राहकांसाठी सुरु केले.

काय आहे १९९ रुपयांच्या प्लानमध्ये?

१९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दिवसाला १.२ जीबी डेटा मिळत आहे. याची व्हॅलिडिटी २८ दिवस असणार आहे. म्हणजेच ग्राहकांना दिवसाला ३३.६ जीबी डेटा मिळेल. फ्री व्हॉईस कॉलबरोबरच इतर फायदेही या रिचार्जमधून ग्राहकांना मिळणार आहेत.

२९९ रुपयांच्या प्लानमध्ये ५६ जीबी डेटा

जिओनं २९९ रुपयांचा प्लानही लॉन्च केला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना दिवसाला २ जीबी इंटरनेट डेटा मिळत आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना ४९९ रुपयांच्या प्लानचेच फायदे मिळत आहेत.