...तर बंद होणार जिओची फ्री कॉलिंग सेवा

तुम्ही रिलायन्स जिओचं सिमकार्ड वापरता? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 5, 2017, 05:06 PM IST
...तर बंद होणार जिओची फ्री कॉलिंग सेवा title=
File Photo

नवी दिल्ली : तुम्ही रिलायन्स जिओचं सिमकार्ड वापरता? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे.

रिलायन्स जिओ अनेक दिवसांपासून आपल्या ऑफर्स आणि प्लान्समुळे चर्चेत आहे. मात्र, आता जिओ युजर्सच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, रिलायन्स जिओने ग्राहकांकडून शुल्क वसुल करण्याचं प्लॅनिंग करत आहे.

गेल्या महिन्यात जिओने आपल्या टेरिफ प्लानच्या दरात वाढ केली. त्यानंतर आता कंपनी फ्री वॉईस कॉलिंगच्या सुविधेवरही बंदी घालण्याची तयारी करत आहे.

रिलायन्स जिओतर्फे आपल्या ग्राहकांच्या कॉलिंगचं मॉनिटरींग केलं जात आहे. जर कंपनीला वाटत असेल की, तुमच्या जिओ नंबरवरुन एखादी कमर्शिअल अॅक्टिव्हिटी होत आहे किंवा फसवणुकीसाठी जिओचा नंबर वापरला जात आहे. तर, कंपनी तुमच्या नंबरवरील अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा बंद करेल.

केवळ ३०० मिनिटचं मिळणार फ्री

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड वॉईस कॉलिंगसोबत प्रति दिन ३०० मिनिटं फ्री कॉलिंग देणार आहे. म्हणजेच जिओच्या नंबरवरुन तुम्ही दिवसभरात ३ तासच फ्रीमध्ये कॉलिंग करु शकाल. या ३०० मिनिटांत तुम्ही कुठल्याही नेटवर्कवर कॉल करु शकता.

जर तुम्ही ३०० मिनिटांपेक्षा अधिक कॉलिंग केलं तर त्या क्रमांकाला कमर्शिअलच्या श्रेणीत टाकण्यात येईल. त्यानंतर या नंबरवरील जिओची फ्री कॉलिंग सुविधा बंद करण्यात येईल.

हे आहेत कंपनीचे काही टेरिफ प्लान ज्यामध्ये मिळते फ्री वॉईस कॉलिंगची सुविधा...

टेरिफ प्लान: १९ रुपये

डाटा: १५०mb ४जी
कॉलिंग: लोकल, STD कॉलिंग फ्री
रोमिंग: लोकल, STD रोमिंग फ्री
SMS: २०
जियो अॅप: जियो अॅप्स पूर्णपणे फ्री
वैलिडीटी: १ दिवस

टेरिफ प्लान: ५२ रुपये

डाटा: १.०५Gb ४जी (दररोज १५०mb)
कॉलिंग: लोकल, STD कॉलिंग फ्री
रोमिंग: लोकल, STD रोमिंग फ्री
SMS: ७०
जियो अॅप: जियो अॅप्स पूर्णपणे फ्री
वैलिडीटी: ७ दिवस

टेरिफ प्लान: ९८ रुपये

डाटा: २.१Gb ४जी (दररोज १५०mb)
कॉलिंग: लोकल, STD कॉलिंग फ्री
रोमिंग: लोकल, STD रोमिंग फ्री
SMS: १४०
जियो अॅप: जियो अॅप्स पूर्णपणे फ्री
वैलिडीटी: १४ दिवस

टेरिफ प्लान: १४९ रुपये

डाटा: ४.२Gb ४जी (दररोज १५०mb)
कॉलिंग: लोकल, STD कॉलिंग फ्री
रोमिंग: लोकल, STD रोमिंग फ्री
SMS: ३००
जियो अॅप: जियो अॅप्स पूर्णपणे फ्री
वैलिडीटी: २८ दिवस

टेरिफ प्लान: ३०९ रुपये

डाटा: ४९Gb ४जी (दररोज १ GB)
कॉलिंग: लोकल, STD कॉलिंग फ्री
रोमिंग: लोकल, STD रोमिंग फ्री
SMS: अनलिमिटेड
जियो अॅप: जियो अॅप्स पूर्णपणे फ्री
वैलिडीटी: ४९ दिवस

टेरिफ प्लान: ३९९ रुपये

डाटा: ७०Gb ४जी (दररोज १ GB)
कॉलिंग: लोकल, STD कॉलिंग फ्री
रोमिंग: लोकल, STD रोमिंग फ्री
SMS: अनलिमिटेड
जियो अॅप: जियो अॅप्स पूर्णपणे फ्री
वैलिडीटी: ७० दिवस

टेरिफ प्लान: ४५९ रुपये

डाटा: ८४Gb ४जी (दररोज १ GB)
कॉलिंग: लोकल, STD कॉलिंग फ्री
रोमिंग: लोकल, STD रोमिंग फ्री
SMS: अनलिमिटेड
जियो अॅप: जियो अॅप्स पूर्णपणे फ्री
वैलिडीटी: ८४ दिवस

टेरिफ प्लान: ४९९ रुपये

डाटा: ९१Gb ४जी (दररोज १ GB)
कॉलिंग: लोकल, STD कॉलिंग फ्री
रोमिंग: लोकल, STD रोमिंग फ्री
SMS: अनलिमिटेड
जियो अॅप: जियो अॅप्स पूर्णपणे फ्री
वैलिडीटी: ९१ दिवस

टेरिफ प्लान: ५०९ रुपये

डाटा: ९८Gb ४जी (दररोज १ GB)
कॉलिंग: लोकल, STD कॉलिंग फ्री
रोमिंग: लोकल, STD रोमिंग फ्री
SMS: अनलिमिटेड
जियो अॅप: जियो अॅप्स पूर्णपणे फ्री
वैलिडीटी: ४९ दिवस