मुंबई : रिलायन्स जिओने आपल्या ४ जी मोबाईल फोनची विक्री सुरु केली आहे. सुरुवातीला हा फोन बुकींग करुनही काही लोकांना मिळाला होता. आता हा फोन सगळ्यांना उपलब्ध झालाय.
जिओच्या ४ जी फीचर फोनची कंपनीने विक्री सुरु केली आहे. त्यासाठी तुम्हाला www.jio.com या कंपनी अधिकृत संकेतस्थळावरून हा मोबाईल विकत घेता येईल.
जिओचा ४ जी फीचर फोन विकत घेण्यासाठी ग्राहकांना १५०० रूपये अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे. १५०० रूपयांची ही अनामत रक्कम तीन वर्षानंतर ग्राहकांना परत मिळणार आहे. त्यामुळे हा फोन तुम्हाला मोफत मिळणार आहे.
- जिओच्या www.jio.com या संकेतस्थळावर जाच.
- संकेतस्थळ सुरु केल्यानंतर आधी तुम्हाला साईटवर जिओचा ४ जी फीचर फोन दिसेल.
- त्यानंतर नाऊ ऑर्डर या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुमचा मोबाईल नंबर टाकून सबमिटवर क्लिक करा.
- मोबाईल नंबर सबमिट केल्यानंतर डिटेल्स मागितले जाईल. त्या डिटेल्समध्ये तुम्हाला पोस्टल कोड टाकायचा आहे.
- जर दुसऱ्या नावांनी मोबाईल घ्यायचे असतील तर अॅड न्यू या ऑप्शनवर क्लिक करा. दुसरा मोबाईल नंबर आणि पोस्टल कोड टाकू शकता. त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करा.
- प्रोसीड केल्यानंतर मोबाईलसाठी द्यावी लागणारे १५०० रूपये भरण्यासाठी तुम्हाला सांगितले जाईल. पे या ऑप्शनवर क्लिक करा आणि पैसे भरा.
- पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येईल. त्यानंतर काही दिवसात जिओचा ४जी फीचर फोन आपल्या हातात पडेल.