Jio Postpaid Offers: Top 3 OTT प्लॅटफॉर्म वर्षभरासाठी Free! Jio च्या या जबरदस्त प्लानमध्ये मिळतोय भरपूर Data

Reliance Jio free OTT Special Offers: रिलायन्स जिओने ओटीटी प्लॅटफॉर्मचे एका वर्षांपर्यंतचे मोफत सबस्क्रीप्शन देण्याची ऑफर दिली असून या ऑफरअंतर्गत दिला जाणारा डेटाही अगदी बराच आहे.

Updated: Mar 7, 2023, 10:06 PM IST
Jio Postpaid Offers: Top 3 OTT प्लॅटफॉर्म वर्षभरासाठी Free! Jio च्या या जबरदस्त प्लानमध्ये मिळतोय भरपूर Data title=
OTT Jio

Jio free OTT Special Offers: भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीच्या मालकीची जिओ (Jio) कंपनी कायमच आपल्या ग्राहकांना रिचार्ज प्लान्सच्या माध्यमातून उत्तम ऑफर्स देत असते. मात्र स्पेशल रिचार्ज प्लान अंतर्गतही या कंपनीने एक विशेष पोस्टपेड प्लान ऑफर केला आहे. विशेष म्हणजे या प्लानमध्ये एक नाही तर अनेक फायदे ग्राहकांना मिळणार आहे. या प्लानची किंमत त्यामधून मिळणाऱ्या फायद्यांच्या तुलनेत फारच कमी आहे. याच प्लानबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

बेसिक प्लान काय?

जिओच्या या प्लानची किंमत 399 रुपये इतकी आहे. यामध्ये ग्राहकांना दर महिन्याला 75 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच दररोज कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएसही मोफत दिले जाणार आहेत. हा प्लान नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video) आणि डिझ्नी+हॉटस्टार (Disney+Hotstar) च्या एका वर्षाच्या मोफत सब्सक्रिप्शनसहीत उपलब्ध आहे.

599 रुपयांचाही पर्याय

हाच अपग्रेडेड प्लान 599 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये 100 जीबी इंटरनेट डेटा, रोज कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि 100 एसएमएस मोफत देण्यात आले आहेत. या प्लानमध्येही नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video) आणि डिझ्नी+हॉटस्टारचे (Disney+Hotstar) एका वर्षाचे सबस्क्रीप्शन मोफत देण्यात आलं आहे. 

799 चा प्लान

हा याच प्लानमधील अधिक अॅडव्हान्स प्लान आहे. यामध्ये 150 जीबी आणि 200 जोबी रोलोव्हर डेटा दिला जाणार आहे. हा एक फॅमेली प्लान आहे ज्यामध्ये अतिरिक्त सिम कार्ड, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉल फ्री, अनलिमिटेड एसएमएसची सेवा देण्यात आली आहे. नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video) आणि डिझ्नी+हॉटस्टारचे (Disney+Hotstar) सबस्क्रीप्शन या प्लानबरोबरही देण्यात आलं आहे.

सर्वात महागडा प्लान

या प्लान्सच्या यादीमध्ये सर्वात महागडा प्लान 999 रुपयांचा आहे. या पोस्टपेड प्लानमध्ये 200 जीबी हाय स्पीड डेटा, 500 जीबी रोलओव्हर डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएसची सेवा देण्यात आली आहे. यामध्ये 3 सीम कार्ड दिली जातील. या प्लानबरोबरही नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video) आणि डिझ्नी+हॉटस्टारचे (Disney+Hotstar) सबस्क्रीप्शन देण्यात आलं आहे.