Jio 5g Service : जिओने (Reliance Jio) टेलिकॉम सेक्टरमध्ये मोठी क्रांती घडवली. जिओने मोजक्या टेलिकॉम सेक्टरपैकी एक आहे ज्यांनी 5 जी सर्व्हिस सुरु केली. जिओने ऑक्टोबरमध्ये अधिकृतपणे 5 जी सर्व्हिस लॉन्च केली. जिओनंतर एअरटेलनेही 5 जी सेवा सुरु केली. आता जिओ 2 शहरांमध्ये 5 जी सेवा सुरु करणार आहे. ही 2 शहरं नक्की कोणती आहेत, तसेच इथे कशाप्रकारे सेवेचा वापर केला जाणार आहे, हे आपण जाणून घेऊयात. (reliance jio launche 5g service in bengaluru and hyderabad)
जिओने बंगळुरु (Jio 5G Bengaluru) आणि हैदराबादमध्ये 5 जी (Jio 5G Hyderabad) सेवा सुरु केली आहे. त्यामुळे आता या 2 शहरात Jio True 5G Offer वॅलिड असणार आहे.
बंगळुरुतील जिओ यूझर्सना आजपासून म्हणजेच 10 नोव्हेंबरपासून 5 जी सेवा वापरता येणार आहे. या 5 जी सर्व्हिसचा स्पीड 1 जीबीपीएस इतकं असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच यूझर्सना जिओ वेलकम ऑफरनुसार (Jio Welcome Offer) अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे.