नवी दिल्ली : ४ जी डाऊनलोडच्या स्पीडमध्ये जिओने इतर कंपन्यांना मागे टाकत स्वतः बाजी मारली आहे. ट्रायने सप्टेंबर महिन्यातील स्पीडचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. त्यात जिओ नंबर वन ठरत आहे. या क्रमवारीत वोडाफोनने दुसरे तर आयडियाला तिसरे स्थान मिळाले आहे.
'मायस्पीड अॅप'च्या माहितीनुसार, रिलायन्स जिओची डाऊनलोड स्पीड सरासरी १८.४३३ Mbps आहे. वोडाफोनची ८.९९९ Mbps तर आयडियाची ८.७४६ Mbpsची आहे. चौथ्या स्थानावर असलेल्या एअरटेलची ४ जी स्पीड ८.५५० Mbps होती. विशेष बाब म्हणजे सर्व कंपन्याची डाऊनलोड स्पीड सरासरी तीन Mbps ने कमी झाला आहे.
४ जी अपलोड स्पीडमध्ये आयडिया ६.३०७ Mbps, वोडाफोन ५.७७६ Mbps तर जिओ ४.१३४ Mbps असा सरासरी स्पीड आहे. अपलोडमध्येही एअरटेलला चौथे स्थान मिळाले आहे. गेल्या तीन महिन्यांची अपलोड स्पीड सरासरी ६.३ Mbps, ५.९ Mbps, ४.४Mbps आणि ४.३ Mbps होती. मायस्पीड अॅपला आणखी चांगलं बनवणार असल्याची माहिती 'ट्राय'ने दिली आहे.