खुशखबर : जिओनं वाढवली या ऑफरची तारीख

रिलायन्स जिओनं त्यांच्या यूजर्सना खुशखबर दिली आहे.

Updated: Mar 20, 2018, 06:04 PM IST
खुशखबर : जिओनं वाढवली या ऑफरची तारीख title=

मुंबई : रिलायन्स जिओनं त्यांच्या यूजर्सना खुशखबर दिली आहे. जिओनं त्यांच्या 'मोअर दॅन १०० परसेंट कॅशबॅक' ऑफरची अंतिम तारीख वाढवली आहे. याआधी ही ऑफर १५ मार्चपर्यंत होती पण आता या ऑफरला ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आलं आहे. जिओच्या या ऑफरमध्ये ग्राहकांना ७०० रुपयांपर्यंतच्या कॅशबॅकचा फायदा मिळत आहे.

३९८ रुपयांच्या रिचार्जवर ४०० रुपयांचे व्हाऊचर्स

जिओच्या कॅशबॅक ऑफरमध्ये ग्राहकानं जर ३९८ किंवा त्यापेक्षा जास्तचं रिचार्ज केलं तर ४०० रुपयांची व्हाऊचर्स मिळत आहेत. याचबरोबर ३०० रुपयांचं कॅशबॅक वॉलेटही मिळत आहे. कॅशबॅक ऑफरमध्ये ग्राहकांना जे व्हाऊचर्स दिले जातील त्या एका व्हाऊचरची किंमत प्रत्येकी ५० रुपये आहे. अशाप्रकारची आठ व्हाऊचर्स ग्राहकांना देण्यात येत आहेत. या व्हाऊचरचा फायदा पुढच्या रिचार्जच्यावेळी माय जिओ ऍपच्या माध्यमातून उचलता येऊ शकतो.

या वॉलेट्समध्ये मिळणार जिओ कॅशबॅक ऑफर

मोबीक्विक, पेटीएम, अमेझॉन पे, फ्री रिचार्ज, फोन पे या मोबाईल वॉलेटवर जिओ कॅशबॅक ऑफरचा फायदा मिळणार आहे. मोबिक्विकवर सर्वाधिक ३०० रुपयांपर्यंत तर पेटीएमवर ५० रुपयांचा कॅशबॅक मिळेल.