३ मिनिटांत विकले गेले तीन लाख फोन, या दिवसांपासून पुन्हा सुरु होणार विक्री

चायनीज मोबाईल निर्माता कंपनी रेडमी नोट ५(Redmi Note 5) आणि रेडमी नोट 5 प्रो (Redmi Note 5 Pro) ची मोठी क्रेझ गुरवारी पाहायला मिळाली. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आणि मी डॉट कॉमवर काही दिवसांतच हा फोन आऊट ऑफ स्टॉक पाहायला मिळाला. या दोन्ही फोनची विक्री गुरुवारी दुपारी १२ वाजता सुरु करण्यात आली होती. 

Updated: Feb 24, 2018, 08:41 AM IST
३ मिनिटांत विकले गेले तीन लाख फोन, या दिवसांपासून पुन्हा सुरु होणार विक्री title=

नवी दिल्ली : चायनीज मोबाईल निर्माता कंपनी रेडमी नोट ५(Redmi Note 5) आणि रेडमी नोट 5 प्रो (Redmi Note 5 Pro) ची मोठी क्रेझ गुरवारी पाहायला मिळाली. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आणि मी डॉट कॉमवर काही दिवसांतच हा फोन आऊट ऑफ स्टॉक पाहायला मिळाला. या दोन्ही फोनची विक्री गुरुवारी दुपारी १२ वाजता सुरु करण्यात आली होती. 

कंपनीचा दावा आहे की अवघ्या तीम मिनिटात ३ लाख फोनची विक्री करण्यात आली. रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो हे दोन फोन कंपनीने दोन दोन पर्यायांमध्ये उपलब्ध केलेत. रेडमी नोट ५ गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या रेडमी नोट ४चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. 

जर तुम्ही २२ फेब्रुवारीला झालेल्या सेलमध्ये रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो विकत घेऊ शकला नाहीत तर कंपनीकडून भारतात २८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजल्यापासून दुसऱी विक्री सुरु होणार आहे. 

फोनमध्ये हायब्रिड सिम स्लॉट

फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर दिला गेलाय. फोनमध्ये १२ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा आहे. तसेच फोनमध्ये ३२ जीबी आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसोबत लॉन्च केले आहेत. पण दोन्हीमध्ये हायब्रिड सिम स्लॉट दिला गेलाय. ३ जेबी रॅमच्या व्हेरिएंटचं ३२ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. 

फोनच्या ४ जीबी रॅम असलेल्या व्हेरिएंटची ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. रेडमी नोट ५ मध्ये ४००० mAh ची बॅटरी आहे. यात प्रिमियम मेटल बॉडी दिली गेलीये आणि हे फोन रेडमी नोट ४ पेक्षा बरेल स्लिम आहेत. 

रेडमी नोट ५ प्रो

रेडमी नोट ५ प्रो ला सुद्धा ५.९९ इंचाची १०८०x२१६० पिक्सल रिझोल्यूशन असलेला डिस्प्लेसोबत लॉन्च केलाय. हा फोन क्वॉलकॉम स्नॅड्रॅगन ६३६ प्रोसेसर असलेला जगातला एकमेव स्मार्टफोन आहे. फोनमध्ये लेटेस्ट क्रायो २६० सीपीयू दिला गेलाय. कंपनीचा दावा आहे की, हा रेडमी नोट सीरिजचा सर्वात फास्ट परफॉर्मन्स असलेला फोन आहे. या फोनला ४ जीबी आणि ६ जीबी रॅममध्ये सोबत लॉन्च केलंय. पण दोन्ही व्हेरिएंटमध्ये ६४ जीबी इंटरनल स्टोरेज दिलं गेलंय. 

फोनमध्ये रिअर ड्युल १२ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सल कॅमेरा सेटअप आहे. ड्युल फ्रन्ट कॅमेरा २० मेगापिक्सलचा आहे. कंपनीने सांगितलंय की, फोनमध्ये कमी लाईटमध्येही सेल्फी घेतली जाऊ शकते. कॅमेरासोबत एलईडी सेल्फी लाईटही आहे. या फोनमध्ये फेसअनलॉकचं फीचरही आहे. हा फोन ब्लॅक, रोज गोल्द, गोल्द आणि ब्लू रंगांमध्ये उपलब्ध असेल.  

किती आहे किंमत?

भारतीय बाजारात रेडमी नोट ५ ची किंमत ९ हजार ९९९ रूपयांपासून सुरू होते. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ९ हजार ९९९ रूपये आहे. त्यासोबतच ११ हजार ९९९ रूपयांमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेलं व्हेरिएंट मिळेल. रेडमी नोट ५ प्रोची ४ जीबी असलेल्या व्हेरिएंटची किंमत १३ हजार ९९९ रूपये आहे. याच्या ६ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत १६ हजार ९९९ रूपये इतकी आहे.