Redmi Note 14 : वॉटरफ्रुप बॉडी, 20 पेक्षा जास्त AI फिचर्स आणि... 2024 मधील सर्वात पावरफुल स्मार्टफोन लाँच

Redmi Note 14 सिरीजचे फोन लाँच झाले आहेत. Redmi Note 14, Note 14 Pro आणि Note 14 Pro+  असे व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. जाणून घेऊया या फोनचे बेस्ट फिचर्स.  

वनिता कांबळे | Updated: Dec 9, 2024, 05:21 PM IST
Redmi Note 14 : वॉटरफ्रुप बॉडी, 20 पेक्षा जास्त AI फिचर्स आणि...  2024 मधील सर्वात पावरफुल स्मार्टफोन लाँच title=

Redmi Note 14 Series :  2024 मधील सर्वात पावरफुल स्मार्टफोन लाँच झाला आहे. रेडमी नोट 14 सिरीज भारत लाँच झाली आहे. रेडीमीने Redmi Note 14, Note 14 Pro आणि Note 14 Pro+  फोन लाँच केले आहेत. या फोनचे बेस्ट फिचर्स म्हणजे या फोनमध्ये वॉटरफ्रुप बॉडी देण्यात आली आहे. पाण्यातही हा फोन वापरता येणार आहे.

Redmi Note 14 सिरीजचे सर्व फोनमध्ये Android 14 वर आधारित HyperOS देण्यात आले आहे. बेस्ट कॅमेऱ्यासह या फोनमध्ये एआय फीचर देखील देण्यात आवले आहे. लाईव्ह इव्हेंटमध्ये हे फोन लाँच करण्यात आले. हा फोन वॉटर तसेच डस्ट फ्रुप आहे. या फोनचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे स्क्रीन पाण्याचे ड्रॉप असतील किंवा स्क्रीनचा सरफेट ऑईली झाला असेल तरी फोन ऑपरेट होईल. ओल्या हाताने या फोनच्या स्क्रीनला टच केले तरी फोन वापरता येणार आहे.

Redmi Note 14 Pro+ मध्ये 20 पेक्षा जास्त AI फिचर्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामुळे हा फोन फोटोग्राफीसाठी बेस्ट आहे. या फोनमध्ये Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसरवर देण्यात आला आहे.  Note 14 आणि Note 14 Pro मध्ये MediaTek Dimension 7025 Ultra आणि MediaTek Dimension 7300 Ultra प्रोसेसर देण्यात आला आहे.    

या फोनमध्ये  50 मेगापिक्सल्स ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) Sony LYT-600 चा मेन कॅमेरा आहे. तर, 12 मेगापिक्सेल सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5,110mAh पावरची दमदार बॅटरी देण्यात आली. या बॅटरीला 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट मिळतो.

Redmi Note 14 Pro+ च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 30,999 रुपये आहे.  8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Redmi Note 14 Pro मॉडेलची किंमत 24,999 रुपये आहे. तर, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Redmi Note 14 फोनची किंमत 18,999 रुपये आहे.  13 डिसेंबरपासून या फोनची विक्री सुरु होणार आहे.