सेल धमाका! एका रुपयात विकत घ्या Redmi 4A

चायनीज स्मार्टफोन निर्माता कंपनी श्याओमीनं (xiaomi) आपल्या तिसऱ्या MI anniversary sale मध्ये ग्राहकांसाठी खास ऑफर सादर केल्यात. 

Updated: Jul 19, 2017, 01:55 PM IST
सेल धमाका! एका रुपयात विकत घ्या Redmi 4A  title=

मुंबई : चायनीज स्मार्टफोन निर्माता कंपनी श्याओमीनं (xiaomi) आपल्या तिसऱ्या MI anniversary sale मध्ये ग्राहकांसाठी खास ऑफर सादर केल्यात. 

या सेलमध्ये ग्राहकांना कंपनीकडून केवळ एका रुपयांत Redmi 4A स्मार्टफोन विकत घेण्याची संधी मिळणार आहे. कंपनीचा हा सेल २० आणि २१ जुलै रोजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दुपारी ११ ते १ वाजेपर्यंत असेल.

भारतात श्याओमीचे तीन वर्ष पूर्ण झाल्यानं हा सेल आयोजित करण्यात आलाय. याद्वारे ग्राहकांना आपल्याकडे वळवण्याचाही प्रयत्न कंपनी करतेय. 

कंपनीच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नकळत कंपनीचं प्रमोशनही करावं लागणार आहे. यूझर्सला कंपनीच्या सेलचं एक वेबपेज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करावं लागणार आहे. त्यानंतरच य़ुझर्स एक रुपयांच्या सेलचा फायदा घेऊ शकतील. 

या सेलमध्ये कंपनी युझर्सना कूपनदेखील देईल. ग्राहक या कुपनच्या माध्यमातून एक्ससरीजवर ५०० रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळवू शकतील. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक ऑफर दिले जाणार आहेत. यावेळी तुम्हाला वायफाय राऊटर २, MI VR प्लेअर, १०००० mAH ची पॉवरबँक, mi Capsule इअरफोन, Mi हेडफोन्स कम्फर्ट, Mi इन-इयर हेडफोन्स प्रो एचडी, Mi इन-ईयर हेडफोन्स बेसिक,  आणि mi सेल्फी स्टिकही विकत घेता येणार आहे.