सरकारी नोकरीची संधी, संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती

संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे.  

Updated: Jul 30, 2020, 09:31 AM IST
सरकारी नोकरीची संधी, संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती title=

मुंबई : संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे. इच्छूक पदवीधर अभियंते आणि विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी घेतलेल्या किंवा अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसह ऑनलाईन अर्ज करु शकतात. (Recruitment & Assessment Centre (RAC) invites online applications from graduate engineers and post graduates in Science including students who are appearing or have appeared in their final year examination through ) त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायवयाचा आहे. निवड झालेल्या उमेदवाराला चांगला पगार मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार (Level-10 (7th CPC) सॅलरी मिळणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख  १७ ऑगस्ट २०२० आहे.

या पदांसाठी होणार भरती :

- पदाचे नाव : इलेक्‍ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग : ३७
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण

- पदाचे नाव : मेकॅनिकल इंजिनियरिंग : ३५
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण

- पदाचे नाव : कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनियरिंग : ३१
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण

- पदाचे नाव : इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग : १२
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण

- पदाचे नाव : मटेरियल सायन्स आणि इंजिनियरिंग/मेटॉलॉजिकल इंजिनियरिंग : १०
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण

- पदाचे नाव : फिजिक्स : ८
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत फिजिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात गेट परीक्षेत उत्तीर्ण

- पदाचे नाव : केमिस्ट्री : ७
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत केमिस्ट्री मध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात गेट परीक्षेत उत्तीर्ण

- पदाचे नाव : केमिकल इंजिनियरिंग : ६
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण

- पदाचे नाव : एरोनॉटिकल इंजिनियरिंग : ४
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण

- पदाचे नाव : मॅथमॅटिक्स : ४
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत मॅथमॅटिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात गेट परीक्षेत उत्तीर्ण

- पदाचे नाव : सिविल इंजिनियरिंग : ३
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण

- पदाचे नाव : सायकॉलॉजी : १०
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत सायकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात नेट उत्तीर्ण

वयोमर्यादा : २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १७ ऑगस्ट २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3hODyX6  

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/2X96Ojh