PMV Electric Car: देशात गेल्या काही वर्षात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली आहे. ऑटो कंपन्या एकापेक्षा एक सरस गाड्या लाँच करत आहेत. मुंबईस्थित स्टार्ट-अप कंपनी पीएमव्ही इलेक्ट्रिकने नुकतीच मायक्रोकार EAS-E (PMV Electric EaS-E) लाँच केली आहे. कंपनीने पीएमव्ही इलेक्ट्रिक EaS-E च्या प्री-ऑर्डर घेणे सुरू केले आहे. ग्राहक ही गाडी फक्त 2,000 रुपयांमध्ये बुक करू शकतो. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 4.79 लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे जी पर्सनल मोबिलिटी सेगमेंटमध्ये सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्याचा मान मिळाला आहे. मात्र ही पॅसेंजर कार नाही. या गाडीला क्वाड्रिसायकल म्हणता येईल. मायक्रोकार ही दोन आसनी क्वाड्रिसायकल आहे. यामध्ये समोरच्या बाजूला फक्त ड्रायव्हरची सीट असते. त्याच्या मागे एक प्रवासी सीट आहे. ही गाडी फ्रंट व्हील ड्राइव्ह असेल. या मायक्रोकारमध्ये 120km, 160km आणि 200km असे तीन रेंज पर्याय असतील.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून 6,000 हून अधिक प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत. Eas-E ची निर्मिती कंपनीच्या पुण्यातील प्लांटमध्ये केली जाणार आहे. पीएमव्हीचे 2023 च्या मध्यापर्यंत वितरण सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. यासोबतच 3 वर्षे/50,000 किमीची वॉरंटीही दिली जात आहे. PMV EAS-E ला चार दरवाजे असून दोन्ही बाजूंनी दोन लोकांना प्रवेश करण्याचा पर्याय देतात. या गाडीत 48V लिथियम-लोह-फॉस्फेट बॅटरी मिळेल. ही बॅटरी चार तासांपेक्षा कमी वेळेत चार्ज होऊ शकते.
Average mature tree absorbs 21 kgs of CO2 in a year.
Average small car emits about 1920 kgs of CO2 in a year.
So 90+ full trees to absorb just one small cars carbon emissions of a year.
India sells about 35,00,000 new cars in a year.#climatechangehttps://t.co/2ZY9dSvh8e pic.twitter.com/auAq27vzI5
— PMV ELECTRIC (@PMVElectric) May 26, 2021
बातमी वाचा- Tesla च्या विना ड्रायव्हर कारचा रस्त्यावर धिंगाणा, सोशल मीडियावर धक्कादायक Video Viral
पीएमव्ही कंपनीच्या मते, EAS-e चालवण्याची किंमत प्रति किमी 75 पैसे पेक्षा कमी असेल. यात IP67-रेटेड मोटर दिली आहे. मोटर 13hp आणि 50Nm चे आउटपुट देऊ शकते. गाडी 0-40kph वेग 5 सेकंदांपेक्षा कमी वेळात धारण करू शकते. त्याचा टॉप स्पीड 70kph असेल.