Oppo find X लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स

...

Updated: Jun 20, 2018, 03:46 PM IST
Oppo find X लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स title=
Image: www.oppo.com

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून लॉन्च होण्याच्या प्रतिक्षेत असलेला Oppo Find X हा फोन अखेर लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये मोटोराइज्ड कॅमेरा स्लायडर जो आपोआप पॉप-अप होतो असे फिचर्स देण्यात आले आहेत. Oppo Find X या फोनचा स्लायडर 3 लाख वेळा तपासला असल्याचा दावा करण्यात आला आहे. पाहूयात या फोनचे इतर फिचर्स आणि किंमत. Oppo Find X या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर, 8GB रॅम आणि 3D फेशियल स्कॅनिंग देण्यात आला आहे. 

Oppo Find X फोनची किंमत

Oppo ने आपल्या Find X या फोनची किंमत 999 यूरो (जवळपास 79,000 रुपये) ठेवली आहे. हा फोन ऑगस्ट महिन्यात उपलब्ध होणार आहे. भारतात या फोनची किंमत आणि उपलब्धतेची माहिती 12 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. यासोबतच Oppo Find X चा लिमिटेड लॅम्बर्गिनी एडिशनही आहे ज्यामध्ये 512 GB स्टोरेज देण्यात आला आहे. कार्बन फायबर बँक सुपर वीओओसी फ्लॅश चार्जची सुविधा असलेल्या या फोनची किंमत 1,699 यूरो (1,34,400 रुपये) आहे.

Oppo Find X डिझाईन

Oppo Find X हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये (रेड आणि ब्ल्यू) उपलब्ध आहे. 3D फेशियल स्कॅनिंग युजर्सला मिळणार आहे. त्यामुळे फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर दिलेला नाहीये. Oppo ने याला ओ-फेस रिकग्निशन म्हटलं आहे आणि दावा केला आहे की, फिंगरप्रिंट सेंसरने हा फोन 20 पटीने अधिक सुरक्षित आहे.

Oppo Find X फोनमध्ये फ्रंट आणि बॅक साईडला कॅमेरा सेंसर दिलेला नाहीये. त्याऐवजी स्मार्टफोनमध्ये मोटोराइज्ड स्लायडर आहे जो उघडतो आणि आपोआप बंद होतो. फोन तुम्ही ज्यावेळी ऑन करता आणि अनलॉक करण्यासाठी स्वाईप करता त्यावेळी पॉप-अप कॅमेरा उघडतो आणि फेस स्कॅन होईल. 

लेटेस्ट ओप्पो स्मार्टफोन कलरओएस 5.1 वर चालतो, जो अँड्राईड 8.1 ओरियोवर आधारित आहे. फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट आहे. Oppo Find X फोनमध्ये 6.42 इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर देण्यात आला आहे. 8GB रॅम, 256 GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आलं असून ही स्टोरेज क्षमता एसडी कार्डच्या मदतीने आणखीन वाढवू शकता.