UPI Payment : सध्याच्या या डिजिटल (Digital) युगात पैशांची देवाणघेवाणही त्याच पद्धतीनं करण्यात येते. पण, यासाठीही काही गोष्टींची गरज भासते. त्यातलंच एक म्हणजे इंटरनेट (Internet). अनेकदा असं होतं की, पेमेंट करत असताना इंटरनेट सुरळीत चालत नसल्यास पेमेंट होण्यात अडथळे येतात. पण, हा त्रासही तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं दूर करु शकता. कसं ते एकदा पाहाच. कारण, कुठेही इंटरनेटमुळे पेमेंट होत नसल्यास तुम्ही ही शक्कल लढवून लगेचच यावर तोडगा काढू शकता.
इंटरनेटशिवाय युपीआय पेमेंट (UPI Payment) करायचं झाल्यास यासाठी तुम्ही USSD कोड वापरू शकता. यासाठी सर्वप्रथम मोबाईलमध्ये तुम्ही UPI Activate करणं अपेक्षित असेल. थोडक्यात तुम्ही यापूर्वी कधी Google Pay, Phone Pay, Paytm किंवा BHIM यांसारखे UPI APP वापरून अकाऊंट लिंक केलं असेल तरच तुम्ही हा कोड वापरु शकता.
- यासाठी तुम्ही रजिस्टर्ड स्मार्टफोनच्या (Smartphone) किपॅड मेन्सूमध्ये जा.
- तिथे *99# डायल करा.
- आता बँक फॅसिलिटीशी संबंधित एक Pop Up तुमच्यासमोर येईल.
- यामध्ये सेंड मनी, रिक्वेस्ट मनी, चेक बॅलेंस, UPI पिन यांसारखे पर्याय मिळतील.
- यातील सेंड मनी या पर्यायावर क्लिक करा. इथे 1 टाईप करुन तो सेंड करा. यानंतर तुम्ही त्या पर्यायाला निवडणं अपेक्षित असेल जिथून पैसे पाठवायचे आहेत.
- यात तुम्हाला मोबाईल नंबर, UPI ID, सेव्ड बेनिफिशियरी आणि तत्सम काही पर्याय मिळतील.
- अपेक्षित पर्याय निवडून पुन्हा एकदा सेंडवर क्लिक करा. आता तुम्हाला इथे बेनिफिशियरीची माहिती द्यावी लागणार आहे. तुम्ही यातून पेमेंटला रिमार्कही देऊ शकता. व्यवहार (Transaction) पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तिथे UPI Pin द्यावा लागणार आहे.
UPI Pin देताच Transaction पूर्ण होईल. म्हणजेच तुम्ही Offline पद्धतीनं पेमेंट केलं असेल. तुम्ही या UPI ला डिसेबलही करु शकता. यासाठी फक्त *99# डायल करा आणि पाहा जादू...