आत्ताच्या आता डिलीट करा हे 4 धोकादायक अ‍ॅप्स, नाहीतर डेटा लिक झालाच समजा

प्लेस्टोरअरवर   (Google Playstore)  असेही काही अ‍ॅप्स असतात, जे आपल्या नकळत डेटा (Data) चोरतात. यामुळे आपलं सोशल मीडिया अकाउंट्स हॅक होण्याची शक्यता असते.  

Updated: Nov 3, 2022, 11:04 PM IST
आत्ताच्या आता डिलीट करा हे 4 धोकादायक अ‍ॅप्स, नाहीतर डेटा लिक झालाच समजा title=

मुंबई : प्लेस्टोरवर (Google Playstore) अनेक फायदे अ‍ॅप्स (Apps) असतात. अनेक अ‍ॅप्स आपण डाऊनलोड करुन गरज संपव्यावर डिलीट करतो. असे अनेक अ‍ॅप्स डाऊनलोड-डिलीट करण्याचा प्रकार सुरुच असतोच. मात्र प्लेस्टोरअरवर असेही काही अ‍ॅप्स असतात, जे आपल्या नकळत डेटा (Data) चोरतात. यामुळे आपलं सोशल मीडिया अकाउंट्स हॅक होण्याची शक्यता असते. तसेच वैयक्तिक माहिती लीक होऊ शकते. असे बरेच अ‍ॅप्स असतात ज्याद्वारे आपल्या नकळत डेटा चोरला जातो. मात्र ते अ‍ॅप्स नक्की कोणते असतात, हे बऱ्याच जणांना ठावूक नसतं. (now delete this 4 dangerous apps in your mobile that leak your personal info and also data)

हे आहेत धोकादायक अ‍ॅप्स

या  धोकादायक  अ‍ॅप्सची नावं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Bluetooth auto connect,  Bluetooth app sender,  driver: Bluetooth, Wi-Fi, USB आणि mobile transfer: smart switch या  अ‍ॅप्सचा समावेश आहे.

हे धोकादायक अ‍ॅप्स आत्ताच्या आता मोबाईलमधून डिलीट करुन टाका. कारण या 4 अ‍ॅप्सची हिस्ट्री पाहिली तर त्यामध्ये अनेक हिडन अ‍ॅप्स आहेत. ज्यामुळे यूझर्सना फार धोका आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे अ‍ॅप्स असलेला मोबाईल जेव्हा लॉक असतो त्या दरम्यानही गूगल क्रोमवर फिशींग साइट्स ओपन करतं. 

यानंतर आपोआप नवी विंडो ओपन होते.  हा मालवेअर यूजर गोपनिय माहिती विकतो आणि त्याद्वारे कमाई करतात. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये असे झोलर अ‍ॅप्स असतील, तर ते आत्ताच डीलिट करा.