What'sApp चं नवं फीचर, ग्रुपमध्ये अॅड करण्यापूर्वी घ्यावी लागणार परवानगी

व्हॉट्सअॅपने दूर केली युजर्सची समस्या

Updated: Apr 5, 2019, 05:14 PM IST
What'sApp चं नवं फीचर, ग्रुपमध्ये अॅड करण्यापूर्वी  घ्यावी लागणार परवानगी title=

मुंबई : जगभरात आज व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आज अनेक जण व्हॉट्सअॅपवरच अनेक कामं उरकून घेतात. व्हॉट्सअॅपमध्ये काही दिवसांमध्ये काहीना काही अपडेट येत असतात. युजर्सच्या समस्या दूर करण्यासाठी आणि सुरक्षेच्या बाबतीत व्हॉट्सअॅप विशेष काळजी घेतो. त्यातच व्हॉट्सअॅप कंपनीने युजर्सची आणखी एक समस्या दूर केली आहे. याआधी कोणीही तुम्हाला कोणत्याही ग्रुपमध्ये तुमच्या ही परवानगी विनाच अॅड करत होतं. पण आता तसं होणार नाही. तुमच्या परवानगी शिवाय तुम्हाला कोणीही कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही. यामुळे अनेकांची डोकेदुखी दूर झाली आहे. 

व्हॉट्सॲप कंपनी युजर्सच्या सूचनांवर नेहमी उपाय शोधतो. सतत काहीना काही नवे फीचर घेऊन येतो. व्हॉटसअॅपनच्या या नव्या फीचरमुळे आता अनेकांनी दिलासा मिळाला आहे. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आता तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कोणीही अॅड करु शकणार नाही. प्रायव्हसी सेटींगमध्ये जावून हे फीचर तुम्हाला सुरु करता येणार आहे.

हे अपडेट सध्या बीटा यूजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. यानंतर सर्व व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी ही सुविधा सुरु होणार आहे. WhatsApp Settings > Account > Privacy > Groups मध्ये जाऊन. तुम्हाला ३ पर्याय विचारले जातील. Everyone, My contact, Nobody असे.

कोणी तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड केलं तर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. 72 तास ती तुमच्या नोटीफिकेशनमध्ये असेल. या दरम्यान तुम्ही ती अॅक्सेप्ट किंवा रिजेक्ट करु शकता.