मुंबई : नोकियाने (Nokia) जानेवारीमध्ये झालेल्या CES 2022 इव्हेंटमध्ये एंट्री-लेव्हल Nokia C200 जबरदस्त स्मार्टफोनची घोषणा केली. आता हा स्मार्टफोन अधिकृतपणे यूएसमध्ये कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. डिव्हाइस V-notch डिस्प्ले, Android 12 OS आणि दोन दिवसांची बॅटरी लाइफ यात असणार आहे.
Nokia C200 ची किंमत $79.99 (अंदाजे रु 6,200) आहे. 3GB RAM + 32GB स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे. हा एक प्रीपेड फोन आहे जो TracFone नेटवर्कवर लॉक केलेला आहे आणि सध्या यूएसमध्ये ऑनलाइन लिस्टेड आहे. राखाडी शेडमध्ये हा उपलब्ध आहे.
Nokia C200 Specifications- किंमतीच्याबाबतीत Nokia C200 हा यूएस मार्केटमधील सर्वात स्वस्त Android 12 फोनपैकी एक आहे. परंतु खरेदी करण्यापूर्वी, लक्षात ठेवा की कॅरिअरचे प्रीपेड मॉडेल आहे. Nokia C200 720 x 1560 पिक्सेलच्या HD+ रिझोल्यूशनसह 6.1-इंचाचा LCD डिस्प्ले प्रदान करत आहे.
Nokia C200 Camera - हे लक्षात घेतले पाहिजे की V-notch डिस्प्ले आहे ज्यात नोकिया ब्रँडिंग आहे. याच्या मागे 13MP मुख्य सिंगल कॅमेरा ऑटो-फोकस सपोर्टसह येतो. त्यासोबत एलईडी फ्लॅश आहे. तसेच सेल्फी 8MP आहे.
Nokia C200 Battery- या फोनमध्ये क्वाड-कोर प्रोसेस आहे आणि 3GB/32GB कॉन्फिगरेशन आहे. हा कदाचित MediaTek Helio A22 चिपसेट आहे, ज्याची घोषणा CES इव्हेंटमध्ये त्या चिपसोबत करण्यात आली होती. स्मार्टफोनमध्ये 4,000mAh बॅटरी आहे, जी दोन दिवसांपर्यंत चालू शकते. पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP52 रेटिंग आहे.