ONLINE PUC काढण्याआधी ही बातमी वाचा, नसते कष्ट टाळा...

आपली गाडी कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार PUC मिळते.

Updated: Apr 28, 2022, 04:40 PM IST
ONLINE PUC काढण्याआधी ही बातमी वाचा, नसते कष्ट टाळा... title=

मुंबई : एक व्यक्ती आपल्या कारने प्रवास करत होती. अचानक त्या व्यक्तीच्या लक्षात आलं की आपल्या कारची PUC संपली आहे. त्यांनी पीयूसी सेंटर गाठले.

तिथे संबंधित व्यक्तीने त्याच्या कॉम्प्युटरवर त्या व्यक्तींचा कारचा नंबर टाईप केला. यानंतर तिथे options आले. BS1, BS2, BS3, BS4, BS6

पीयूसी सेंटरवरील व्यक्तीने BS3 सिलेक्ट केले. पण, त्या कारमालकाने त्याला BS4 हे option सिलेक्ट करायला लावले. मात्र, तसे करण्यास पीयूसी सेंटरवरील व्यक्तीने नकार दिला.

त्याने असं का केलं? आणि काय आहे हे option चं रहस्य

सरकारी नियमाप्रमाणे आता गाडीचे PUC certificate हे PUC सेंटरवर online काढून मिळते. आपली गाडी कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार PUC मिळते.

त्या कारमालकाने माझी कार BS4 असल्याचे सांगितले. पण, तो BS4 हे option सिलेक्ट करत नव्हता. कार मालकाने त्याला कारण विचारले. तेव्हा त्याने सांगितले, BS4 गाडी घेतल्यापासून फक्त 2 वर्षेच valid असते वगैरे.

कारमालकाला ते कारण पटलं नाही, त्याची चौकशी सुरूच होती. अखेर त्याला त्या मागचं खरं कारण कळलं. ते असं की BS3 चे PUC सर्टिफिकेटची मुदत  फक्त सहा महिने इतकी असते. तर, BS4 चे नामांकनाचे PUC सर्टिफिकेट हे पूर्ण एक वर्षांसाठी valid असते.

या घटनेवरून असे लक्षात येते की, आपण आपली गाडी वर्षातून दोन वेळा PUC साठी त्यांच्याकडे घेऊन जातो. शिवाय PUC सहा महिन्याने expire झाल्यावर ट्रॅफिक पोलिसाने पकडल्यावर दंड होईल तो निराळाच.

PUC ची अधिकृत फी ही 110 रुपये असतानाही काही ठिकणी जास्त फी घेतली जाते. पण, जास्त रक्कम देऊ नका.