Car Buying Tips: पगार कमी आहे? कोणती कार घ्यावी, नवीकोरी की Second Hand, जाणून घ्या संपूर्ण गणित

Car आपल्या हक्काच्या कमाईनं खरेदी करावं, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण, बऱ्याचदा आर्थिक गणितं यात आडकाठी आणतात. पण, आता चिंता नसावी.... 

Updated: Sep 7, 2022, 12:24 PM IST
Car Buying Tips: पगार कमी आहे? कोणती कार घ्यावी, नवीकोरी की Second Hand, जाणून घ्या संपूर्ण गणित  title=
new or old which car to buy read vehicle Buying Tips

Car Financial values: सध्याचा काळच असा आहे जिथं प्रत्येकजण स्वत:ची हक्काची कार खरेदी करण्याची इच्छा मनी बाळगून असतं. पण, अनेकदा असं होतं की कार खरेदी करतेवेळी आर्थिक गणितं बिनसतात आणि नाईलाजानं हे स्वप्नही मागे पडून जातं. सरतेशेवटी मग Second Hand कार खरेदी करण्याला प्राधान्य देण्यात येतं. थोडक्यात काय, तर कार कधी, कुठे आणि कोणती खरेदी करायची हे सर्वकाही महिन्याला खात्यात जमा होणाऱ्या पगारावर अवलंबून असतं. अशा वेळी कारचं स्वप्न पाहचंच नाही? तसं नाहीये.... कमी पगारातही तुम्ही कार खरेदी करु शकता. 

केव्हा खरेदी करावी कार? 
जर तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात राहता, तर तिथं (Cab, Auto, Taxi) कॅब, रिक्षा, टॅक्सीच्या सुविधा सहज मिळतात. हल्लीतर लहान शहरांमध्येही या सुविधा उपलब्ध आहेत. पण, जर तरीही तुम्ही स्वत:चं वाहन खरेदी करु इच्छिता तर आधी तुमची आर्थिक कुवत जाणून घ्या. यामध्ये पगार, Job Security, तुमच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात ठेवा. Car खरेदी करतेवेळी तिचा EMI तुमच्या पगाराच्या 7-10 टक्के इतका असावा. 

(Salary) पगाराचा मोठा वाटा दैनंदिन गोष्टींचा खर्च आणि गुंतवणुकीत निघून जातो. अशा वेळी पगाराच्या 10 टक्क्यांहून अधिक भाग गुंतवणुकीत टाकू नका. 

किती किमतीपर्यंतची कार खरेदी करावी? 
जर तुम्ही एका सर्वसामान्य कुटुंबात आहात, तर सर्वसाधारणपणे 7 लाख रुपये इतकं बजेट तुम्ही ठेवू शकता. यासाठी Maruti WagonR, Tata Punch किंवा जवळपास या बजेटमध्ये येणारी कार तुम्ही निवडू शकता. 

वाचा : 'या' आहेत भारतातील 10 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार, जाणून घ्या

 

कार खरेदी करताना Downpayment साठी 1 लाख रुपये द्यावे लागतात. उरलेले ६ महिने EMI मध्ये जोडले जातात. कारसाठी सहसा 5 ते 7 वर्षांचं कर्ज घेतलं जातं. 5 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास त्यासाठी 8.5 टक्के व्याज आकारलं जातं. 

उदाहरणार्थ 
नव्या कारची किंमत - 7 लाख रुपये 
डाउन पेमेंट- 1 लाख रुपये
लोन अमाउंट- 6 लाख रुपये
कर्जाचा कालावधी- 5 वर्षे
व्याज दर- 8.5% 
EMI- 14,362 रुपये महिना
एकूण रक्कम : (डाउन पेमेंट+EMI)= (1,00,000+8,61,694= 9,61,694 रुपये)

सेकंड हँड कारचा पर्याय उत्तम 
पगाराची रक्कम 1 लाखाहूनही कमी आहे आणि कर्ज भरण्यातच पगाराचा 20 टक्के भाग जात असेल, तर नवी कार घेण्याचा पर्याय पूर्णपणे चुकीचा असेल. अशा परिस्थिती तुम्ही चांगल्या परिस्थितीतील Second Hand Car निवडू शकता. 
Second Hand Car चं गणित 
कारची किंमत- 3 लाख रुपये 
डाउन पेमेंट- 1 लाख रुपये
लोन अमाउंट- 2 लाख रुपये
कर्जाचा कालावधी- 5 वर्षे 
व्याज दर- 9 टक्के
EMI- 4,152 रुपये महिना
एकूण किंमत- (डाउन पेमेंट+EMI)= (1,00,000+2,49,100= 3,49,100 रुपये)

हिशोब अगदी स्पष्ट आहे, आता पर्याय निवडण्याची वेळ तुमची...