टाटाची 'HSX' या एसयूव्ही कॉन्सेप्टची कार लॉन्च

आजकाल कार मार्केटमध्ये स्पोर्ट्स युटिलीटी व्हेईकलचा जमाना आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 9, 2018, 04:54 PM IST

नवी दिल्ली : आजकाल कार मार्केटमध्ये स्पोर्ट्स युटिलीटी व्हेईकलचा जमाना आहे. याच सेगमेंटमध्ये 'स्पोर्टस् मोबिलीटी इन स्मार्ट सिटीज' नावाच्या संकल्पनेखाली टाटा मोटर्सनं यंदा ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये आपली हजेरी लावलीय. 

'स्पोर्टस् मोबिलीटी इन स्मार्ट सिटीज'

याच संकल्पनेत येणारी नवी HSX या एसयूव्ही कॉन्सेप्टची कार लॉन्च केली. येत्या काही वर्षात ही गाडी रस्त्यावर येईल अशी अपेक्षा आहे. पाच सीटर लक्झरी कॉन्सेप्ट कार सद्या  सगळ्यांच्याच आकर्षणाचं केंद्र ठरतीय.