.@RailMinIndia @WesternRly this is parel / elphinston bridge. We heard People died due to stampede ? Good returns of my tax! @narendramodi pic.twitter.com/Yj0tySttCo
— Chirag Joshi (@chiragmjoshi) September 29, 2017
मुंबई : एलफिन्स्टनच्या चेंगराचेंगरीचा व्हिडीओ ट्वीटरवर ट्रेन्ड होतोय, प्रत्यक्षात घटना घडली तेव्हा काय स्थिती होती, ही जाणून घेण्याची उत्सुकता नेटीझन्सला आहे. चिराग जोशी यांचा हा व्हिडीओ ट्वीटरवर दिसून येत आहे. मुंबईत एलफिन्स्टन ते परळ स्टेशनला जोडणाऱ्या पायऱ्या या मृत्यूच्या पायऱ्या आहेत असंच म्हणावं लागेल.
अचानक दीड तास दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस झाला. काही दिवसांपासून मुंबईत पाऊस नव्हता, म्हणून पाऊस बंद झाल्यावर कार्यालय गाठू या, अशा प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांची प्लॅटफॉर्म आणि पादचारी पुलांवर गर्दी वाढू लागली. याच दरम्यान नवीन लोकल प्लॅटफॉर्मला आल्यानंतर आणखी गर्दीत वाढ होवू लागली, अखेर प्रचंड गर्दी झाली, प्रवाशांची पायऱ्यांवर तसेच पादचारी पूल आणि प्लॅटफॉर्मवर गर्दी पुढे सरकू लागली.
अचानक पावसाने अचानक उघडीप दिल्याने सर्वांना स्टेशन बाहेर पडायचे होते, अशा वेळेतच अचानक चेंगराचेंगरी झाल्याने, अनेक प्रवासी एकमेकांखाली दबले गेले, यात आतापर्यंत १५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर ५० च्या जवळपास व्यक्ती जखमी झाले आहेत.