होंडाने पुन्हा मागवली अॅक्टिवा, ग्रेजिया आणि एविएटर, यामध्ये तुमची गाडी तर नाहीये ना?

होंडा मोटरसायकलची अॅक्टिवा या गाडीला तरुणांसोबतच इतरांनाही खूपच पसंती मिळाली. यासोबतच ग्राजिया आणि एविएटर या गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. तुमच्याकडेही अॅक्टिवा, ग्राजिया किंवा एविएटर यापैकी एखादी गाडी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Apr 2, 2018, 06:34 PM IST
होंडाने पुन्हा मागवली अॅक्टिवा, ग्रेजिया आणि एविएटर, यामध्ये तुमची गाडी तर नाहीये ना? title=

मुंबई : होंडा मोटरसायकलची अॅक्टिवा या गाडीला तरुणांसोबतच इतरांनाही खूपच पसंती मिळाली. यासोबतच ग्राजिया आणि एविएटर या गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. तुमच्याकडेही अॅक्टिवा, ग्राजिया किंवा एविएटर यापैकी एखादी गाडी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे.

होंडाने पुन्हा मागवल्या गाड्या

होंडा मोटरसायकलने नुकतचं लॉन्च केलेली Activa 125, ग्राजि‍या आणि एवि‍एटर या गाड्यांच्या काही युनिट्स पुन्हा मागवल्या आहेत. तांत्रिक अडचण आल्यामुळं कंपनीने या गाड्या पुन्हा मागवण्याचा निर्णय घेतला आहे.

...म्हणून घेतला हा निर्णय

या स्कूटर्समधील फ्रँट फॉर्कमध्ये लावण्यात आलेला बोल्ट खूपच कडक आहे आणि त्यामुळेच होंडाने आपल्या एकूण 56,194 स्कूटर्स पुन्हा मागवल्या आहेत. देशभरातील होंडा सर्व्हिस सेंटर्सवर या गाड्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

फ्री मध्ये करणार बदल

तसेच गरज पडल्यास बोल्ट बदलण्यात येणार आहे. बोल्टमध्ये फ्री मध्ये बदलून देण्यात येणार आहे आणि होंडा डीलरशिप लवकरच या संदर्भातील माहिती ग्राहकांना देणार आहे.

अॅक्टिवा 4जी आणि 5जी चा समावेश नाही 

होंडाने आपल्या वेबसाईटवर म्हटलं की, कंपनीने पुन्हा मागवलेल्या अॅक्टिवा 125, ग्राजिया आणि एविएटरची संख्या 56,194 युनिट्सचा समावेश आहे. मात्र, अॅक्टिवा 4जी आणि अॅक्टिवा 5जी पुन्हा मागवण्यात येणार नाहीये कारण, या दोन्ही स्कूटर्समध्ये वेगळं सस्पेंशन सेटअप देण्यात आलं आहे.

7 फेब्रुवारी 2018 ते 6 मार्च 2018 या दरम्यान तयार करण्यात आलेल्या अॅक्टिवा 125, ग्राजिया आणि एविएटर मधील खराब बोल्टला तपासलं जाणार आहे.

तुमची गाडी यात आहे का? असं तपासा

होंडाने आपल्या वेबसाईटवर एक कॅम्पेन पेजवर या संदर्भात माहिती दिली आहे. या पेजच्या खालील बाजुला व्हिआयकल आयडेंटिफिकेशन नंबर (VIN) बॉक्स आहे त्याठिकाणी आपल्या स्कूटरवर VIN नंबर टाकून माहिती मिळू शकते. या व्यतिरिक्त ग्राहकांना टेक्सट मेसेज, ई-मेल किंवा फोनद्वारेही कळवण्यात येणार आहे.