मुंबई : स्मार्टफोनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोला आपल्या G सीरिजचे दोन नवे स्मार्टफोन आज भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. मोटोरोला कंपनीतर्फे G सीरिजचे Moto G6 आणि Moto G6 Play आज भारतात लॉन्च करण्यात येणार आहे.
मोटोरोला कंपनी या दोन्ही फोन्सचं लॉन्चिंग दिल्लीत सकाळी 11.45 वाजता करणार आहे. फोनचा लॉन्चिंग कार्यक्रम मोटोरोलाचं युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर लाईव्ह पहायला मिळणार आहे.
Moto G6 हा फोन अॅमेझॉनवर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तर Moto G6 Play हा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि मोटो हब येथे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. मात्र, कंपनीने या दोन्ही फोन्सची किंमत अद्याप जाहीर केलेली नाहीये.
Moto G6 फोनमध्ये अँड्राईड ओरियो 8.0, 5.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन, ड्युअल रियर कॅमेरा (12+5 मेगापिक्सल), स्नॅपड्रॅगनचा ऑक्टाकोअर प्रोसेसर, 3GB / 4GB रॅम, 32GB/64GB स्टोरेज मिळणार असून आवश्यकता असल्यास मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने 128 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. तसेच फोनमध्ये 3000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
या फोनमध्ये 5.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 427 प्रोसेसर, 2GB/3GB रॅम, 16GB/32GB स्टोरेज, 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 5 MP चा फ्रँट कॅमेरा आणि 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.