मोटोरोलाच्या या फोनच्या किंमतीमध्ये कपात

मोटोरोलानं त्यांच्या मोटो G5S प्लस या स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Jan 2, 2018, 10:39 PM IST
मोटोरोलाच्या या फोनच्या किंमतीमध्ये कपात title=

मुंबई : मोटोरोलानं त्यांच्या मोटो G5S प्लस या स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट २०१७मध्ये हा स्मार्टफोन १५,९९९ रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. आता १ हजार रुपयांची कपात करून हा स्मार्टफोन अमेझॉनवर १४,९९९ रुपयांना मिळणार आहे.

मोटो G5S प्लसची फिचर्स

६४ जीबी इंटरनल मेमरी (१२८जीबी एक्सपांडेबल)

४ जीबी रॅम

१३ मेगापिक्सल सेन्सर रियर कॅमेरा

क्वालकोम स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर

3,000mAh बॅटरी

टर्बोपावरमुळे १५ मिनिटांच्या चार्जिंगवर ६ तासांचा बॅकअप

५.५ इंच फूल एचडी स्क्रीन

गोरीला ग्लास