नवी दिल्ली : पिक्सल एक्सएल क्वाईट ब्लॅक वेरियंटची किंमत ई-कॉमर्स साईट्सवर चक्क 36000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
सुरूवातीला याची किंमत 76000 रुपये होती. ती कमी करून 39,999 रुपये करण्यात आली आहे. यादरम्यान नवीन पिक्सल 2 एक्सएलची किंमत देखील कमी करण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर 49,999 रुपयांना हा फोन उपलब्ध आहे.
गुगलने सांगितले की, याच्या 64 GB मॉडलची किंमत प्रथम 73,000 रुपये होती आणि 128 GB मॉडलची किंमत 82,000 रुपये असेल. हे फ्लिपकार्ट, रिलान्यस डिजिटल आणि देशातील स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतील. गुगल पिक्सल एक्सएल मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 821 क्वाड कोर प्रोसेसर सोबत 4 GB रॅम आहे.
हा स्मार्टफोन 'क्वाइट ब्लैक', 'वेरी सिल्वर' आणि 'रियली ब्लू' रंगात उपलब्ध आहे. गुगल पिक्सल 2 एक्सएलमध्ये 6.0 इंचाचा पी-ओएलईडी डिस्प्ले आहे. ज्याचे क्यूएचडी प्लस पिक्सल रिज्यूलूशन आहे आणि याचा एसपॅक्ट रेशिओ 18:9 आहे. याच्यावर कॉर्निंगचे गोरिल्ला ग्लास 5 लागलेले आहे. हा स्मार्टफोन अॅनरॉईड ओरिओ सोबत मिळतो. यात 12 मेगापिक्सलचा बॅक कर 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. याची बॅटरी 3,520 एमएएच आहे.