शाओमीचा हा स्मार्टफोन ५८ सेकंदात आऊट ऑफ स्टॉक

शाओमीने अलीकडे मिग-प्रकारचा स्मार्टफोन एमआय मिक्स 2 लॉन्च केला. हा सेल माध्यमांमध्ये सुरूवातीपासून खूपच चर्चेत राहिला.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 15, 2017, 08:42 PM IST
शाओमीचा हा स्मार्टफोन ५८ सेकंदात आऊट ऑफ स्टॉक title=

चीन : शाओमीने अलीकडे मिग-प्रकारचा स्मार्टफोन एमआय मिक्स 2 लॉन्च केला. हा सेल माध्यमांमध्ये सुरूवातीपासून खूपच चर्चेत राहिला.

चीनमध्ये हा फ्लॅश सेल शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. सेलच्या केवळ ५८ व्या सेकंदात हा स्मार्टफोन आऊट ऑफ स्टॉक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

साधारणपणे या फ्लॅश सेलमध्ये किती फोन विक्रीसाठी होते याची माहिती अद्याप कंपनीने दिली नाही. शाओमीने  मिक्स २ सह एमआय टीप ३ लाँच केले आणि या फोनची विक्री शुक्रवारी निश्चित करण्यात आली. परंतु या फोनच्या विक्रीची आकडेवारी सध्या समोर आली नाही.