'शाओमी'चा इलेक्ट्रिक टूथब्रश पाहिलात का? जाणून घ्या किंमत

काय आहेत या टूथब्रशचे फिचर्स - 

Updated: Feb 22, 2020, 11:50 AM IST
'शाओमी'चा इलेक्ट्रिक टूथब्रश पाहिलात का? जाणून घ्या किंमत title=

नवी दिल्ली : 'शाओमी'ने भारतात आता इलेक्ट्रिक टूथब्रश लॉन्च केला आहे.  'Mi Electric Toothbrush T300' असं या टूथब्रशचं नाव आहे. कंपनीने Mi Electric Toothbrush जागतिक बाजारात २०१८ मध्ये लॉन्च केला होता. हा टूथब्रश एका मिनिटांत ३१ हजार वेळा व्हायब्रेट होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यात मॅग्नेटिक लेव्हिएशन सोनिक मोटर लावण्यात आली आहे. Mi Electric Toothbrush T300 आयपीएक्स ७ वॉटरप्रुफ आहे.

Mi Electric Toothbrush T300 काय आहेत या टूथब्रशचे फिचर्स -

'Xiaomi'ने दिलेल्या माहितीनुसार, हा इलेक्ट्रिक टूथब्रश २५ दिवसांची बॅटरी बॅकअप देतो. यात टाईप सी यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. ज्याने टूथब्रश चार्ज करता येतो. ब्रश करताना यामुळे कमी आवाज येतो. यात डुअल प्रो ब्रश मोड देण्यात आला आहे. जो  EquiClean ऑटो टायमरसह येतो. सामान्य ब्रशपेक्षा हा इलेक्ट्रिक ब्रश १० पटीने अधिक चांगली स्वच्छता करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

टूथब्रशची किंमत -

कंपनीने या टूथब्रशबाबत सर्व माहिती जाहीर केली आहे. भारतीय बाजारात या टूथब्रशची किंमत १५९९ रुपये इतकी आहे. परंतु सध्या कंपनी या टूथब्रशची १२९९ रुपयांत विक्री करत आहे. कंपनी सुरुवातीला या टूथब्रशनचे केवळ १००० यूनिट्सच विकणार आहे. 'शाओमी'च्या ऑनलाईन स्टोरवर टूथब्रश बुक करता येऊ शकतो. १० मार्चपासून याची शिपिंग सुरु होणार आहे. जागतिक बाजारात कंपनीने हा टूथब्रश २९.९९ यूरो म्हणजेच जवळपास २३०० रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला होता.

'Mi Electric Toothbrush T300' मध्ये 'शाओमी'ने, मॅग्नेटिक लेव्हिटेशन सोनिक मोटर आणि ऍन्टी कोरोशन, मेटल फ्री ब्रश हेड देण्यात आला आहे. यूजर्स Mi Electric Toothbrushला मोबाईल ऍपशी कनेक्ट करत, ब्रश टाईम, ब्रश स्ट्रेन्थ कंट्रोल करु शकतात. 'एमआय इलेक्ट्रिक टूथब्रश टी३००' ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह स्मार्टफोनशी कनेक्ट करता येऊ शकतो. याच्या ऍपद्वारे यूजर्स आपली ब्रशिंग रिपोर्ट मासिक, साप्ताहिक आणि दैनंदिन वापराविषयीची माहिती ट्रॅक करु शकतात.