तू फक्त जागा सांग! Zuckerberg ने स्वीकारलं Elon Musk चं Challenge, आता पुढे काय?

Mark Zuckerberg Accepts Elon Musk Challenge: मस्क यांनी मार्क यांच्या नव्या योजनेसंदर्भात बोलताना टीका केली होती. त्यावरुन मस्क यांना एकाने सावध राहण्याचा सल्ला दिला असता त्यांनी थेट मार्क यांना आव्हान दिलेलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 22, 2023, 04:20 PM IST
तू फक्त जागा सांग! Zuckerberg ने स्वीकारलं Elon Musk चं Challenge, आता पुढे काय? title=
सोशल मीडियावरुनच स्वीकारलं आव्हान

Zuckerberg Accepts Musk Challenge: सोशल मीडियावरील प्रसिद्ध लोकांचे वाद हे काही नवीन राहिलेलं नाही. अनेकदा दिग्गज आणि कोट्यावधींच्या संख्येनं फॉलोअर्स असलेल्या प्रसिद्ध लोकांमध्ये वाद झाल्याचं पहायला मिळतं. असाच काहीसा प्रकार सध्या फेसबुकची पालक कंपनी असलेल्या 'मेटा'चे मुख्य कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी ट्वीटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी दिलेलं आव्हान स्वीकारलं आहे. 

नेमकं प्रकरण काय?

मस्क यांनी मेटाचे सीईओ ट्वीटरप्रमाणे टेक्सवर आधारित नवीन 'थ्रेड' नावाची सेवा सुरु करणार असल्याच्या वृत्ताला रिप्लाय केला होता. "मला विश्वास आहे की लवकरच संपूर्ण पृथ्वी झुकरबर्गच्या अंगठ्याखाली असेल आणि आपल्याकडे काहीच पर्याय उपलब्ध नसेल," असा खोचक टोला मस्क यांनी लगावला होता. यावर एका युझरने मस्क यांना सावध राहा मार्कने जू-जीत्सू ही जपानी लढण्याची शैली शिकल्याचं सांगितलं. त्यावर मस्क यांनी, "मी केज मॅचसाठी तयार आहे, अर्थात जर तो तयार असेल तर," असा मेजशीर रिप्लाय केला होता. यावरच आता मार्क झुकरबर्ग यांनी हे आव्हान स्वीकारल्याचं म्हटलं आहे.

झुकरबर्ग यांचा इन्स्ताग्रामवरुन रिप्लाय

झुकरबर्ग यांनी मस्क यांच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. या ट्वीटमध्ये मस्क यांनी आपण केज मॅच म्हणजेच बंदीस्त पिंजऱ्यामधील बॉक्सिंग मॅच खेळण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं होतं. हा स्क्रीनशॉट शेअर करत झुकरबर्ग यांनी 'सेण्ड मी लोकेशन' म्हणजेच 'मला कुठे यायचं आहे ते सांग' असं म्हटलं आहे. झुकरबर्ग यांच्या इन्स्ताग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. 

मार्क जू-जीत्सू शिकलेत

मार्क झुकरबर्ग यांनी कोरोना साथीच्या कालावधीमध्ये हैस म्हणून कराटेप्रमाणे जपानमध्ये खेळला जाणारा जू-जीत्सू हा सेल्फ डिफेन्सचा प्रकार शिकला. तो ब्राझीलमधील जू-जीत्सूच्या पहिल्या स्पर्धेमध्ये जिंकला होता. मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या इन्स्ताग्राम अकाऊंटर जू-जीत्सूचा सराव करत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता. आपण पुढच्या स्पर्धेसाठी तयारी करत असल्याचं मार्क यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं होतं.

मस्क मार्शल आर्ट्सचे विद्यार्थी

विशेष म्हणजे मस्क हे सुद्धा मार्शल आर्ट शिकले आहेत. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मार्शल आर्टच्या सामन्यासाठी यापूर्वीच आव्हान दिलं होतं. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर मार्च महिन्यामध्ये मस्क यांनी ट्वीटरवरुनच पुतिन यांनी एकच सामना होऊन जाऊ द्या आपल्यात असं म्हणत त्यांना आव्हान दिलं होतं. त्यावेळीही मस्क यांच्या या आव्हानाची चांगलीच चर्चा झाली होती.