तुमच्या iPhone ला असा बनवा अॅन्ड्रॉईड फोन!

जर तुम्ही आयफोन वापरत असाल आणि आपल्या मित्र-मैत्रिणींच्या अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनमधील फिचर तुम्हाला आकर्षित करत असतील... तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Updated: Aug 5, 2017, 06:36 PM IST
तुमच्या iPhone ला असा बनवा अॅन्ड्रॉईड फोन! title=

नवी दिल्ली : जर तुम्ही आयफोन वापरत असाल आणि आपल्या मित्र-मैत्रिणींच्या अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनमधील फिचर तुम्हाला आकर्षित करत असतील... तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

ई-कॉमर्स वेबसाईट येरहा डॉट कॉमनं शुक्रवारी 'मीसूट' नावाचं एक आयफोन केस लॉन्च केलंय. अॅन्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या या 'स्मार्ट केस'मध्ये दोन सिम वापरता येतात.

या स्मार्ट केसमध्ये १७०० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. याशिवाय, यात १६ जीबी इंटरनल मेमरीदेखील आहे. ही केस म्हणजे, दोन स्मार्टफोन खरेदी करण्यासारखं आहे.

एका लायटिंग पोर्टच्या मदतीनं हे डिव्हाईस आयफोनला कनेक्ट करतं... आणि 'एपस' लॉन्चरसोबत आयफोनवर अॅन्ड्रॉईड ओएस चालतं. 

'मीसूट' स्मार्ट केसची किंमत आहे ९९९० रुपये... हा स्मार्ट केस केवळ आयफोन ६ आणि आयफोन ६ एसवर वापरला जाऊ शकतो.