Barbie ची स्पेशल एडिशन कार लॉन्च, किंमत ऐकून तुमची ही झोप उडेल

Barbie ची ही Maserati Grecale, जागतिक स्तरावर फक्त दोन कस्टम युनिट्समध्ये उपलब्ध असणार आहे.

शैलेश मुसळे | Updated: Oct 28, 2022, 05:43 PM IST
Barbie ची स्पेशल एडिशन कार लॉन्च, किंमत ऐकून तुमची ही झोप उडेल title=

मुंबई : कार खरेदी करताना त्याचा रंग मॅटर करतो. अनेक जण आपल्या आवडत्या रंगाची कार खरेदी करण्यासाठी प्राधान्य देतात. बाजारात आणखी एक कार आली आहे. ही कार खास आहे. कारण पहिल्यांदाच Barbie Dolls बनवणाऱ्या कॅलिफोर्नियाची कंपनी Mattle ने कार बनवणारी कंपनी Maserati सोबत टायअप केलं आहे. Maserati ने बार्बी थीम असलेली लग्जरी कार लॉन्च केली आहे. शिमरिक पिंक रंगाची ही कार लेटेस्ट एसयूवी Grecale आहे.

Barbie म्हटलं की, आधी डोळ्यासमोर येतो तो गुलाबी रंग. पण पहिल्यांदाच लग्जरी कार Barbie कडून बाजारात आणली जात आहे. पण तुम्ही या कारची किंमत ऐकून हैराण व्हाल. कारण या कारची किंमत जवळपास 27 कोटी रुपये आहे.

बार्बी मासेरती ग्रीकेलची फक्त 2 कस्टम युनिट जगभरात मिळणार आहे. या कारच्या विक्रीतील 10% रक्कम ही Barbie Dream Gap Project साठी जाणार आहे. हा प्रोजेक्ट मुलींच्या सन्मानासाठी तयार केला गेला आहे.

कंपनीने Barbie ब्रँड पुन्हा एकदा रिव्हाईज करण्याचं काम केलं आहे. ज्यामुळे हा ब्रँड पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

Maserati Grecale कार बार्बीच्या गुलाबी रंगामध्ये येणार आहे. यामध्ये 530 hp चे V6 Nettuno इंजिन असणार आहे. या कारला शानदार लूक दिला गेला आहे. या कारवर Barbie चा लोगो देखील असणार आहे. या कारमध्ये लेदर सीट, काळ्या रंगाची डॅशबोर्ड, कारपेट देखील देण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे उन्हामध्ये ही कार रेन