मुंबई : मारूती आपली नवी मल्टी परपज व्हीएल अर्टिगा आज 21 नोव्हेंबर रोजी लाँच होणार आहे. कंपनी 11 हजारात या कारची बुकिंग करत असून कारमध्ये 1.3 लीटर डिझेल आणि 1.5 लीटर पेट्रोल इंजिन असं वेरिएंट देण्यात आली आहे. कंपनीचा असा दावा आहे की, वेरिएंटमध्ये अगोदरपासूनच जास्त मायलेज देण्यात आलं आहे.
कारमध्ये स्मार्ट हायब्रिड व्हीकल तकनीक देण्यात आली असून पेट्रोल वर्झन अर्टिका पहिल्यांदा SHVS मध्ये देण्यात आली आहे. कारमध्ये ड्युअल बॅटरी सिस्टम देण्यात आला आहे.
कंपनीने न्यू अर्टिगाच्या पहिल्या बॅचला आपल्या डिलर्सकडे पाठवलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार दिल्लीमध्ये याच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.66 लाख रुपये आहे. जुन्या अर्टिगापेक्षा याचं वजन 20 किमीपेक्षा कमी असून या कारमध्ये मायलेज सुधारण्याची आशा आहे.
पेट्रोल अर्टिगाचं मायलेज मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये क्रमश: 19.34 किमी प्रती लीटर आणि 18.69 किमी प्रती लीटर आहे. अर्टिगा डिझेल 25.47 किमी प्रती लीटर मायलेज देणार आहे.
या अगोदरच्या अर्टिगाला कंपनीने इंडोनेशिया इंटरनॅशनल मोटर शो 2018 मध्ये सादर केलं होतं. जुन्या अर्टिगापेक्षा नवीन MPV लूक अतिशय आकर्षक आहे. जर तुम्ही देखील कारची बुकिंग करू इच्छिता तर ऑफिशिअल वेबसाइटवर करू शकता. नवीन अर्टिगामध्ये जास्त जागा असून इंजिन जास्त पावरफुल आहे.