जगभरात फेसबूक आणि इंस्टाग्राम झालं डाऊन

फेसबूक आणि इंस्टाग्राम युजर्सला येतायंत अडचणी

Updated: Nov 20, 2018, 08:27 PM IST
जगभरात फेसबूक आणि इंस्टाग्राम झालं डाऊन title=

मुंबई : जगभरात सध्या फेसबूक आणि इंस्टाग्राम लॉगिन करताना अडचणी येत आहे. फेसबुक मॅसेंजरनंतर आता जगभरात अनेक फेसबूक आणि इंस्टाग्राम डाऊन झालं आहे. गेल्या 1 तासापासून या अडचणी येत आहे. फेसबूक अॅपवर देखील याचा परिणाम झाला आहे. जगभरात फेसबूक वापरणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. पण असं अचानक पणे फेसबूक बंद झाल्याने अनेकांना अडचणी येत आहे.

फेसबूक लॉगिन केल्यानंतर "Facebook is down for required maintenance right now, but you should be able to get back on within a few minutes."
असा मॅसेज येत आहे.

फेसबूक ओपन झालं तरी मग पोस्ट करताना अडचणी येत आहे. अनेक जणांनी याबाबत तक्रारी नोंदवल्या आहेत. अनेकांना फेसबूकवर त्यांचा डीपी दिसत नाहीये तर न्यूज फीड लोड करताना देखील अडचणी होत आहेत. फेसबूक पेज लोड होताना देखील अडचणी होत आहे. लवकरात लवकर ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं फेसबूककडून सांगण्यात येत आहे.

24 तासामध्ये इंस्टाग्राम, मॅसेंजर आणि फेसबूक या तिनही जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया पोर्टल अडचणीत आल्या आहेत. काहींना पोस्ट करताना अडचण येते आहे तर काहींचं लॉगिनच होत नाही आहे. अशा तक्रारी जगभरातून होत आहे.

आज सकाळीच फेसबूक मॅसेंजर देखील क्रॅश झालं होतं. पण कंपनीकडून अजूनही याबाबत कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही.